सावली बाजार समितीचे सचिव सुरमवार व प्र.लेखापाल पिपरे बडतर्फ

0
21

सावली,दि.30ः- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेश सुरमवार व प्रभारी लेखापाल उमाजी पिपरे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवेतून 25 एप्रिल 19 पासून मुख्य प्रशासक अविनाश पाल यांच्या आदेशान्वये बडतर्फ करण्यात आले आहे.त्यांच्यावर समितीच्या कामकाजात मानहाणीकारक व नुकसानदायक कृत्य केल्यामुळे बाजार समितीचे कर्मचारी कायद्यान्वये लोकसेवक असल्यामुळे तथा भ्रष्टाचार प्रतीबंधक कायद्यानुसार नरेश सुरमवार व उमाजी पिपरे यांचेवर आरोपपञ दाखल करण्यास बाजार समितीने मंजूरी देणे आवश्यक असतांना मंजूरी न दिल्यामुळे जिल्हा उपनिबंधक चंद्रपुर यांनी 18 ऑक्टोबंर 2016 चे आदेशान्वये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करुन आरोपपञ दाखल केले होते.जिल्हा उपनिबंधक चंद्रपुर यांचे पञानुसार नरेश सुरमवार व उमाजी पिपरे यांना 6 जानेवारी 2018 च्या आदेशान्वये निलबींत करण्यात आले होते, त्यानंतर सुरमवार व पिपरे यांचेवर अनुक्रमे 5 व 2 दोषारोप ठेऊन सेवानिवृत सहाय्यक निबंधक यांची चौकशी अधिकारी म्हणुन नेमून चौकशी पुर्ण करण्यात आली, त्या चौकशी अहवालानुसार सुरमवार व पिपरे चौकशीत पुर्णत: दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना कायमचे बडतर्फे करण्यात आले. तरी बाजार समितीचे अडते , व्यापारी, मापारी, व शेतकरी बांधवानी सदरव्यक्तीशी बाजार समिती संबधात कसल्याही प्रकारचे व्यवहार करू नये किवा हितसंबध ठेऊ नये असे आवाहन प्रशासक पाल यांनी केले आहे.