बालवयापासून सुसंस्काराची गरज -ना. बडोले

0
31

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-आपल्या पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्त्मक असेल ततर ईश्‍वर एकच आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाची संकल्पना निर्माण केली व सर्व जाती-धर्मांना एकत्रितत जोडण्याचे काम केले. संतत तुकाराम महाराजांनी ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देव तेथेची जाणावा, तोची सांध ओळखावा’ ही शिकवण दिली. देशात अनेक संत महात्मे व थोर महापुरुष जन्मास आले त्यांनी जगाला मानवतेची शिकवण दिली. आजच्या तणाला खर्‍या अर्थाने सुसंस्कारीत शिक्षणाची गरज आहे, आणि अशा शिबिरातून बालकांना उज्‍जजवल भविष्यासाठी बालवयापासूनच सुसंस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केले.
राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडी गुरूकुंज मोझरी आणि राष्ट्रधर्म सेवार्शम खांबी (पिंपळगाव) यांच्या वतीने खांबी येथे २३ एप्रिल तते २ मे पर्यत आयोजित सर्वागिण बाल सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य कमलताई पाऊलझगडे, रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोळे, दुर्योधन मैंद, सरपंच प्रकाश शिवणकर, कृष्णकांत खोटेले, पुरूषोत्तम डोये, अण्णाजी डोंगरवार, खुशाल काशिवार, व्यंकट खोब्रागडे, नुतन सोनवाने, आनंदराव सोनवाने, संदिप कापगते, देवानंद रामटेके उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने पावन झालेल्या भुमीत राष्ट्राला अभिप्रेत असलेले युवक युवती घडविण्यासाठी सर्वांगिण बाल सुसंस्कार श्शिबिराचे कुलगुरू आचार्य हरीभाऊ वेरूळकर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात ८६ ते ८७ बाल सुसंस्कार शिबिर सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजुर्नी मोरगाव तालुक्यातील खांबी येथे परिसरासाततील बालकांना बलशाली, ज्ञानशाली बनविण्यासाठी आणि जीवन शिक्षणाचे धडे देवून कुटुंबाला समाजाला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषण असे तरूण घडविण्यासाठी या बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.