नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भिती

0
26

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि..१: जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका असलेल्या कुरखेडापासून 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळीले लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने सी 60  जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.पहाटे वाहनांची जाळपोळ  झालेल्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे हे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते.सध्या घटनास्थळ परिसरात पोलीस व नक्षल्यामध्ये मोठ्याप्रमाणात चकमक सुरु असून गडचिरोली वरुन पोलीसांची अधिक कुमक पाठविण्यात आली आहे.तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी सबकॅम्पमधूनही जवानांची तुकडी रवाना करण्यात आली आहे.

आज मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी  पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील लेंढारी नाल्याजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे.या स्पोटापासून काही अंतरावरच पाणी पुरवठा विभागाच्या पाणी टाकीचेही बांधकाम सुरु आहे.गेल्या काही दिवसापासून गप्प बसलेल्या नक्षल्यानी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत.स्पोट एवढा मोठा होता की शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पसरलेले असून स्पोट झालेल्या वाहनाचे तुकडे तुकडे झालेले आहेत.