महाराष्ट्र राज्य वर्धापनदिनी गडचिरोली येथे ध्वजारोहण

0
14

गडचिरोली,दि.01:-.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापनदिन सोहळा पोलिस कवायत मैदान येथे झाला. पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या  हस्ते ध्वजारोहण झाले. पालकमंत्री श्री.आत्राम यांनी परेडचे निरीक्षण केले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अपर पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, मोहित गर्ग,हरी बालाजी. तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व मान्यवर  उपस्थित होते.

परेड कमांडर पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वात संचलन झाले. संचलनामध्ये विशेष अभियान पथक, विशेष कृती दल, पोलिस मुख्यालय येथील पुरुष पथक, महिला पोलिसांचे पथक, वाद्य पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांचा समावेश होता.पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, माध्यम प्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचलन क्रिडा अधिकारी मदन टापरे, यांनी केले .  कार्यक्रमाला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच  नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.