समग्र ब्राम्हण सभेतर्फे परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी

0
10
गोंदिया : भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्याकरीता समग्र ब्राम्हण सभेच्या संयोजन समितीची बैठक नुकतीच सिव्हील लाईन येथील महिला मंडळ सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समग्र ब्राम्हण सभेचे अध्यक्ष प्रा.निलेश चौबे होते.
यावेळी भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात नियोजन करण्यात आले. यात जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सोमवार, ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी ७ वाजता भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन तर मंगळवार, ७ मे रोजी सकाळी ९ वाजता भव्य वाहन रॅली,  सायंकाळी ५ वाजता श्री पूजन व सायंकाळी ५.३० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभाायात्रा महिला मंडळ सभागृह सिव्हील लाईन येथून प्रारंभ होवून शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करणार आहे. तसेच  दरवर्षीप्रमाणे समाजातील वरिष्ठांचा सत्कार कार्यक्रमातंर्गत यावर्षी स्व.पं.शंकरलाल शर्मा यांच्या स्मृतिमध्ये समाजातील प्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकांचा सत्कार करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे समापन रात्री ८.३० वाजता  महाप्रसादाने होणार आहे. यावेळी समग्र ब्राम्हण सभेच्या बैठकीत महाराष्टÑीयन ब्राम्हण, उत्तर भारतीय ब्राम्हण, राजस्थानी ब्राम्हण, गुजराती ब्राम्हण, पंजाबी ब्राम्हण, मैथीली ब्राम्हण, दक्षिण भारतीय ब्राम्हण, बंगाली ब्राम्हण, उडिया ब्राम्हण व सिंध ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येत  उपस्थित होते. तरी सदर आयोजित कार्यक्रमात नियोजनानुसार अधिकाधिक संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन समग्र ब्राम्हण सभातर्फे करण्यात आले आहे.