‘या’ मैदानात टीम इंडिया खेळणार पहिली मॅच

0
55

मुंबई(एजंसी)दि.02 मे: क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप. यंदाच्या वर्षी होणारा क्रिकेट वर्ल्ड कप लवकरच सुरु होणार होणार असून त्यासाठी क्रिकेट विश्वातील टॉप 10 टीम्स सज्ज झाल्या आहेत. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमी या क्रिकेट वर्ल्ड कपची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्या नेत्रृत्वात भारतीय टीम आपली पहिली मॅच 5 जून रोजी खेळणार आहे. टीम इंडियाची पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. इंग्लंडमध्ये अनेक मोठ-मोठी मैदानं आहेत मात्र, भारत ज्या मैदानातून आपल्या क्रिकेट वर्ल्ड कप 2019ची सुरुवात करणार आहे ते मैदाना थोडं वेगळं आहे.

का आहे हे मैदान खास?

टीम इंडिया आपली पहिली मॅच खेळण्यासाठी ज्या मैदानात उतरणार आहे ते इतर मैदानांपेक्षा थोडं वेगळं आहे. हे मैदान आहे हॅम्पशायर येथील Rose Bowl स्टेडियम. या स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच होणार आहे. या मैदानात आंतरराष्ट्रीय मॅचेस खूपच कमी खेळल्या जातात कारण, या मैदानात प्रेक्षकांना बसण्याची क्षमता ही एकूण 15000 आहे. या स्टेडियममध्ये इंग्लंडच्या स्थानिक मॅचेस आणि काऊंटी क्रिकेट मॅचेस खेळल्या जातात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या दोन्ही टीम्सच्या मॅचेस या ठिकाणी झालेल्या नाहीयेत. खास बाब म्हणजे हे स्टेडियम बनल्यानंतर या ठिकाणी पहिली मॅच इंग्लंडच्या टीमने खेळली नाही तर दक्षिण आफ्रिक विरुद्ध झिम्बाब्वे अशी झाली होती. या मैदानात गेल्या 18 वर्षांत एकूण 22 वन-डे मॅचेस खेळण्यात आल्या आहेत.

या मैदानात भारताने खेळलेल्या मॅचेस 

  1. भारत विरुद्ध केनिया – 2004 – भारताने 98 रन्सने जिंकली मॅच
  2. भारत विरुद्ध इंग्लंड – 2007 – इंग्लंडने 104 रन्सने जिंकली मॅच
  3. भारत विरुद्ध इंग्लंड – 2011 – इंग्लंडने 7 विकेट्सने जिंकली मॅच

या मैदानात दक्षिण आफ्रिकेने खेळलेल्या मॅचेस

  1. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे – 2003 – दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्सने जिंकली मॅच
  2. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – 2012 – दक्षिण आफ्रिकेने 80 रन्सने जिंकली मॅच
  3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – 2017 – इंग्लंडने 2 रन्सने जिंकली मॅच