भाईचारा मैत्री कार्यक्रमाचे छोटा गोंदियात उत्साहात आयोजन

0
16

गोंदिया,दि.04:संविधान बचाव कृती संघाच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा फुले, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत तुकड़ोजी महाराज यांच्या जयंती पर्वा निमित्त असंघटीत समाज संघटित व्हावा व समाजात भाईचारा बन्धुत्व मैत्री निर्माण व्हावे या उद्देशाने ओबीसी, एस.सी., एस.टी.,अल्पसंख्याक वर्ग समुदायाचा भाईचारा मैत्री, संविधान जनजागृती कार्यक्रम मंतर चौक गांधी वार्ड ओल्ड गोंदिया येथे महाराष्ट्र दिना दिवशी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, कृष्णा बहेकार, ओबीसी संघर्ष कृती समिति चे हरिश ब्राम्हणकर, कैलाश भेलावे, ड़ॉ. संजीव रहांगडाले, जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्ष सविता बेदरकर, फुले शाहू आंबेडकरी संस्कार केंन्द्राचे संचालक महेंद्र कठाणे, युवा बहुजन मंच चे जिल्हाध्यक्ष सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर, अतुल खोब्रागडे, मातंग समाज संघाचे गवली काकाजी, एम्बस चे यशवंत रामटेके, BGW हॉस्पिटल ब्लड बैंक अधिकारी अनिल गोंडाने, चव्हान सर, प्रामुख्याने उपस्थीत होते.
उपस्थित मान्यवरानी मार्गदर्शन करताना एकमुखाने संबोधन केले “बहुजन समाज संघटित होण्याकरिता समाजात भाईचारा मैत्री कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज असुन संत गुरु महामानवांचा नुसता उदो उदो, जयजयकार करून चालणार नाही तर त्यानी सांगीतलेल्या मार्गावर चालुन समता, स्वातंत्र्य, बन्धुत्व, व न्याय अशा संविधानीक मूल्यांवर आधारित समाज निर्माण होने आवश्यक आहे. महामानवांचा हाच खरा जयजयकार ठरेल. ”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कठाणे तर संचालन अतुल सतदेवे, यानी केले। उपस्थितांचे आभार व्यक्त संविधान बचाव कृती संघाच्या संरक्षिका पौर्णिमाताई नागदेवे यानी केले. आयोजनाकरिता बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे, संविधान बचाव कृती संघाच्या पोर्णिमा नागदेवे, संजूताई खोब्रागडे, समवेत स्थानिक कार्यकर्ते, राहुल खोबरागड़े, उत्तम यादव, संतोष यादव, राहुल रामटेके, बालू मोटघरे आशीष देशभ्रतार, संजय भोंगाड़े इमरान शेख़, प्रेम साठवने, संतोष वैद्य, सुनीता वैद्य, माधुरी भेलावे, रिना भोंगाडे, आशा भांडारकर, राजेश्वरी रहांगडाले, रुपाली रोटकर, तसेच नागार्जुन बुद्ध विहार समिती महिला मंडळ आदिनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड़ करणा-या या कार्यकर्त्यांना भेंट स्वरुप संत गुरु महामानवांच्या साहित्य पूस्तिका प्रदान करण्यात आले.