मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

सैनिकांच्या पाल्यांकरिता अहमदनगर येथे सैन्य भरती

वाशिम, दि. ०४ : अहमदनगर येथील मेक्नाई मेक्नाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर येथे केवळ आजी, माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांकरिता आणि प्राविण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी २७ मे २०१९ पासून सोल्जर जी डी, सोल्जर क्लार्क/एस.के.टी. आणि सोल्जर ट्रेडस्मन पदांकरिता सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अहमदनगर येथील मेक्नाई मेक्नाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर येथील हरीपाल स्टेडियम येथे २७ मे २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजतापुर्वी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. रिलेशनशिप प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे, असे वाशिम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

सोल्जर जी डी पदासाठी ४५ टक्के गुणांसह १० वी पास असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षित असलेल्यांना ४५ टक्केची अट लागू नाही. सोल्जर क्लार्क/एस.के.टी. पदासाठी ६० टक्के गुणांसहित १२ वी पास आणि प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. सोल्जर ट्रेडस्मन पदासाठी केवळ ८ वी किंवा १० वी पास असणे आवश्यक आहे.

सोल्जर जी डी पदासाठी साडेसतरा ते एकवीस वर्ष, सोल्जर क्लार्क/एस.के.टी. पदासाठी साडे सतरा ते तेवीस वर्ष आणि सोल्जर ट्रेडस्मन पदासाठी साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील पात्र इच्छुक उमेदवारांनी या सैन्य भरतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वाशिम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे वाशिम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Share