ग्रीष्मकालीन योग-क्रीडा व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबीराचे कारंजा येथे उद्घाटन

0
17

वाशिम, दि. ०४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम तथा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय कारंजा (लाड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीष्मकालीन योग-क्रीडा व व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ३ मे २०१९ रोजी कारंजा लाड तालुका क्रीडा संकुल येथे कारंजाचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार होते.यावेळी विजय पाटील काळे, प्राचार्य शशीकांत नांदगावकर, राजेश लढाऊ, विजय मोटघरे, नितीन मेंढे, सुनिल राऊत, राहुल गावंडे, आनंद पेंटे, चोपडे काका, तालुका संयोजक पराग गुल्हाणे व श्रीरंग सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. जाधव यांनी कारंजातील खेळाडूंनी या ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. श्री. काळे यांनी शिबीरास शुभेच्छा देवुन उपस्थित असलेल्या खेळाडूंचे कौतुक केले. तालुका क्रीडा अधिकारी श्री. उप्पलवार यांनी मोबाईलकडे वळणाऱ्या युवा पिढीला या ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीराच्या माध्यमातून मैदानावर येण्याचे आवाहन केले. तसेच क्रीडा शिबीराकरिता लागणाऱ्या क्रीडा साहीत्याची उपलब्धता करुन देण्याचे आश्वासन दिले.

या ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीरात प्रामुख्याने बास्केटबॉल, हॅण्डबॉल, आर्चरी, बॅडमिंटन, कबड्डी, तायक्वादो, डॉलबॉल, टेनिक्वाईट,  टेबल टेनिस इत्यादी खेळांचे प्रशिक्षण ३ मे २०१९ ते  ३० मे २०१९ या कालावधीत सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल सुडके यांनी केले. सुत्रसंचालन व आभार विवेक गहाणकारी यांनी मानले.