राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ खेळाडूंना शिष्यवृत्ती

0
26

वाशिम, दि. ०४ : सन २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत पत्यक्ष सहभाग व नैपुण्यप्राप्त १५ खेळाडूंना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून त्याची रक्कम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. तरी संबंधित खेळाडूंनी बँक खाते पासबुक, आधार कार्ड, राष्ट्रीय प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शिष्यवृत्तीची ही रक्कम खेळाडूंच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेली कल्याणी पांडुरंग गादेकर व सॉफ्टबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ऋषिकेश श्रीराम धर्माधिकारी यांना प्रत्येकी ८ हजार ९५० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच राष्ट्रीय शालेय क्रीडा व इतर स्पर्धेत सहभागी झालेल्या वैभव मोहन उगले (कबड्डी), संजना गोपाल मौर्य (कबड्डी), जयश्री राम बुंदेले (कबड्डी), तेजस राऊत (कबड्डी), सौरव आरुडे (कबड्डी), शेख गालिब (कबड्डी), धनश्री कदम (कबड्डी), हेमंत प्रकाश शेंद्रे (थ्रोबॉल), सृष्टी गजानन विटकरे (थ्रोबॉल), नंदिनी दीपक कटारिया (हॅण्डबॉल), इर्षा हरिष वानखेडे  (हॅण्डबॉल), एजाजअली अजीजअली मुल्लाजी (हातोडा फेक) व प्रसन्न सुनील देशमुख (कराटे) या खेळाडूंची प्रत्येकी ३ हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली असल्याचे श्री. शेटीये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.