मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

अदानी फाउंडेशन क्रिकेट स्पर्धेत ठाणेगाव संघ ठरला विजेता

तिरोड़ा,दि.05 : अदानी फाउंडेशनच्या वतीने अदानी पावरच्या  परिसरसरातील १६ ग्रामपंचायततीतील युवकांसाठी २३ एप्रिल ते ३०एप्रिप्रल दरम्यान शांतीग्राम,टाउनशीपच्या भव्य पटांगणावर आयोजित दिवसरात्री क्रिकेटच्या सामान्यामध्ये ठाणेगाव संघ विजयी ठरला. या सामन्यांचा बक्षिश वितरण सोहळा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या हस्ते पार पडला.
अध्यक्षस्थानी अदानी पावर प्रमुख सी.पी.साह होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे,गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे,वनपरिक्षेत्राधिकारी आखरे,अदानी पावर ऑपरेशन अ‍ॅन्ड मेन्टनन्स हेड चटर्जी, अदानी फाउंडेशन हेड नितीन शिराळकर,एच.आर. विभाग प्रमुख हरिप्रसाद अडथळे,रांगणेकर, नितीन पाठक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अदानी फाउंडेनशच्या या उपक्रमाचे कौतुक करतांना लटारे यानी स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला व अदानी फाउंडेशनद्वारा अतिशय दर्जेदार अशा क्रिकेट सामान्याचे आयाेजन व केल्याबद्दल अदानी
फाउंडेशनचे कौतुक केले. तर अदानी पावर प्रमुख सी.पी. शाहू यांनी विजेता, उपविजेता व सहभागी संघाचे कौतुक करून पुढीrल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या हस्ते विजेता ठाणेगाव संघाला १५ हजार रुपये रोख व चषक तसेच उपा विजेता संघाला अकरा हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आले.उत्कृष्ठ खेळाडू व सामनाविराचा सन्मान ठाणेगाव संघाचा खेळाडू नितेश खोब्रागडे याला तर उत्कृष्ठ फलंदाज म्हणून उत्कर्ष मेश्राम खैरबोडी तर उत्कृष्ट गोलदांज म्हणून बेरडीपार संघाचा नरेश पारधी या खेळाडूला सन्मान चिन्ह व एक हजार रुपये रोख या प्रमाणे प्रत्येकी देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशन सह अदानी पावरच्या कर्मचाNयांनी परिश्रम घेतले.

Share