मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

फेसबुकवरून ‘हे’ फीचर आता होणार ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकने मॅसेंजर कोड स्कॅनिंग फीचर नंतर आता अजून एक फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख अ‍ॅप ‘हाऊसपार्टी’ चं एक क्लोन बंद करणार आहे. ‘बोनफायर’ या क्लोनिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. ‘बोनफायर’ हे क्लोन अ‍ॅप मे महिन्यात बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, ‘बोनफायर’ हे क्लोन अ‍ॅप मे महिन्यात बंद करण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला शिकता आल्या, त्यांचा उपयोग भविष्यात लाँच होणाऱ्या अन्य गोष्टींसाठी आम्ही करू, असं फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुकवर ‘हाऊसपार्टी’ नावाची एक ग्रुप व्हिडिओ चॅटिंग सुविधा आहे. जी ओपन केल्यावर युजर्सना कोण-कोण ऑनलाईन आहे हे कळतं आणि ऑनलाईन असलेल्या हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडीओ चॅट करता येतं. फेसबुक इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर पण ग्रुप व्हिडीओ चॅटसारखे फीचर जोडत आहे. या अ‍ॅपचं टेस्टिंग फेसबुकने २०१७ मध्ये सुरू केलं होतं.

फेसबुकचे नवीन फीचर
तसेच फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे. मित्रांसोबत व्हिडीओ बघण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. तसेच हा व्हिडीओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फीचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावर काम करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

Share