सक्रिय रुग्ण शोध क्षयरोग मोहिम 19 मे पर्यंत

0
16

 गडचिरोली,दि.6:- एकेकाळी असाध्य समजला जाणारा क्षयरोग आता औषधांनी दुर शकत असला तरी या रोगाचा अदयाप समुळ नायनाट झालेला नाही. त्यामुळे जिल्हयात केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सक्रिय क्षयरोग रुग्णशोध मोहिमेला  6 मे 2019 पासुन प्रारंभ होणार असुन जिल्हयात 10 कार्यक्षेत्रात 98 चमुद्वारे घरोघरी जावुन क्षयरोग रुग्ण शोधण्यात येणार आहे. ही क्षयरोग रुग्ण शोध मोहिम 6 मे ते 19 मे 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, व आशा चमुद्वारे विशिष्ट निकशानुसार निवडलेल्या कार्यक्षेत्रात मोहिम राबविण्यात येणार आहे. आपल्याला आपल्या जिल्हयातील लोकसंख्येमधुण सक्रिय रुग्ण शोध मोहिम सर्वेक्षण राबवायचे आहे.

जिल्हयातील तालुका क्षयरोग पथकाअंतर्गत कार्यक्षेत्रातील 98 घरोघरी  भेटी देवून क्षयरोगाची लक्षणे माहिती देणे व संशयीत क्षयरुग्ण आढळल्यास त्यांचे दोन थुंकी नमुने घेवून जवळच्या तपासणी केंद्रात तपासणी करीता देणे व थुंकी नमुण्यात जंतू आढळल्यास तसेच एक्स-रे द्वारे तपासणीत आढळल्यास आवश्यकते नुसार CBNAAT  मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्षेत्राचे पर्यवेक्षण व संनियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक , वैद्यकिय अधिक्षक वैद्यकिय अधिकारी, व त्यांचे कर्मचारी करणार आहे.

 या मोहिमेत जे नविन क्षयरुग्ण आढळतील त्यांना त्वरीत योग्य वर्गवारी नुसार दैनिक डोजाचा उपचार जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात  येणार आहे. या मोहिमेला नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शशिकांत शंभरकर , जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी , डॉ.सचिन हेमके यांनी केले आहे.क्षयरुग्णास औषधउपचार काळात चांगल्या प्रकारे प्रथिनयुक्त आहार घेण्यासाठी दर महा 500/- रुपये औषधउपचार संपेपर्यंत देण्यात येणार आहे. क्षयरुग्णांनी आपले बॅक खाते क्रमांक, आधार क्रमांक, जवळच्या प्रा. आ. केंद्रात दयावी. असे आवाहन करण्यात आले आहे.