पाचव्या टप्प्यात 61.8 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74 टक्के मतदान

0
15

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांसाठी मतदान पार पडले. या टप्प्यात 61.8 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74 टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशमध्ये 63 टक्के आणि राजस्थानमध्ये 63 टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये देखील 64 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आज मतदान झालेल्या मतदारसंघात 8 कोटी 75 लाख मतदार तर 674 उमेदवार आहेत. मध्यप्रदेशातील बैतुल येथील एका मतदानकेंद्रावर नवरदेवाने नवरीमुलीला आधी मतदानासाठी मतदानकेंद्रावर स्वतःच नेऊन मतदान करविले.

बंगालमध्ये हिंसा तर पुलवामात ग्रेनेडचा हल्ला
पश्चिम बंगालमध्ये सलग पाचव्या टप्प्यातील मतदानात हिंसा घडली आहे. येथील बैरकपूर येथे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. टीएमसीच्या गुंडानी माझ्यावर हल्ला केला आहे. या गुंडांना बाहेरून आणण्यात आले आहे. हे लोक मतदारांमध्ये भय निर्माण करत आहेत. यांच्या मारहाणीत मी देखील जखमी झाल्याचे भाजपा उमेदवार अर्जुन सिंह यांनी सांगितले. तर येथे पुन्हा मतदान करण्याची भाजपाने मागणी केली आहे.दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील रोहमू मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्याच्या थोड्याच वेळात ग्रेनेडचा हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पुलवामा अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येते. येथून माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तीसह 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अमेठीमधील भाजपच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधीवर बुथ कॅप्चरिंगचा आरोव लावला आहे. इरानी म्हणाल्या की, मी प्रशासन आणि निवडणूक आयोगाला अलर्ट करण्यासाठी ट्वीट केले आहे, आशा करते की ते यावर लवकरच कारवाई करतील. त्यासोबतच त्या म्हणाल्या, आता लोकांनी ठरवायचे आहे की, राहुल गांधींच्या अशा कृत्यावर त्यांना दंड मिळाला पाहिजे का नाही. या ट्वीटसोबत स्मृती ईराणी यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात एक वृत्ध महिला भाजपला मतदान करणार असल्याचे म्हणत आहे, पण बळजबरीने त्यांचा हात पकडून त्यांना काँग्रेसला मतदान देण्यास सांगितले.यावेळी उत्तरप्रदेशच्या सगळ्यात जास्त 14 सीटसाठी मतदान होत आहे. आज यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती ईरानीसोबतच अनेक मोठ्या नेत्यांचे भवितव्य मतदारांवर अवलंबुन आहे.

पाचव्या टप्प्यात हे मोठे नेते मैदानात

सोनिया गांधी :रायबेरली मतदारसंघ विरूद्ध भाजपचे दिनेश प्रताप सिंह
राहुल गांधी :अमेठी आणि वायनाड मतदारसंघ विरूद्ध भाजपच्या स्मृती ईराणी
राजनाथ सिंह :लखनऊ मतदारसंघ विरूद्ध सपाच्या पूनम सिन्हा आणि काँग्रेसचे प्रमोद कृष्णम
जितिन प्रसाद : जितिन प्रसाद मतदारसंघ विरूद्ध भाजपच्या रेखा वर्मा
राज्‍यवर्धन सिंह राठौर : जयपूर ग्रामीण मतदारसंघ विरूद्ध काँग्रेस आमदार कृष्णा पूनिया
राजीव प्रताप रूडी :सारण मतदारसंघ राजदचे चंद्रिका राय