कामठा येथे ७२ जोडप्यांचे शुभमंगल आज

0
10

गोंदिया,दि.०७: येथील प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने तालुक्यातील ग्राम कामठा येथे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार (दि.७) सायंकाळी ६.३० वाजता सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ७२ जोडप्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने शुभमंगल लावले जाणार आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्यात आमदार गोपालदास अग्रवाल, मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, मध्यवर्ती बँकेचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद अकबरअली, सभापती मनोज डोंगरे, शैजला सोनवाने, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी मंत्री महादेवराव शिवणकर, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, पालकमंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार हरिहरभाई पटेल, के.आर. शेंडे, विनोद जैन,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले, संजय पुराम यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. सोहळ्यासाठी पंडाल, भोजनकक्ष, जानवसा, जोडप्यांना दिला जाणारे साहित्या, लग्न लावण्यासाठी पंडीत व भंते यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला आमंत्रीतांच्या मनोरंजनासाठी लावणीची व्यवस्था करण्यात आली आहे.