विद्यार्थी, शिक्षक व पालक विद्यार्जनाची त्रिसूत्री-चौधरी

0
19

नवेगावबांध,दि.०७: विद्यार्थी, शिक्षक व पालक ही विद्यार्जनाची त्रिसूत्री असून यांच्या समन्वयातूनच विद्याथ्र्यांचे उज्वल भविष्य घडते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी विनोद चौधरी यांनी केले.येथील जवाहर नवोदय विद्यालयात २१ एप्रिल रोजी आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य एम.एस. बलवीर, प्राचार्य मंगला गडकरी, पुष्कर बारापात्रे, अभियंता दिगंबर कटरे, संतोष नरुले, जगदीश पवार, रामदास बोरकर, संजीव बडोले, सतीश कोसरकर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली. वार्षिकोत्सवात विद्याथ्र्यांनी समुहगीत, लावणी, समुहनृत्य, बिहू, घुमर, गरबा तसेच पारंपरिक लोकनृत्याची मेजवानी सादर केली. तसेच आधुनिक समाज माध्यमांची माहिती व त्यातील धोके, अंधश्रद्धेच्या आहारी जाणाèया समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे बुवाबाजीवर आधारित व आजच्या काळातील समाजकारण व राजकारणातील भ्रष्टाचाराचे दाभाडे काढणारे लघुनाट्य हे या वार्षिकोत्सवाचे खास वैशिष्ट होते. नृत्य शिक्षक गोल्डी ठाकुर यांनी सादर केलेले शास्त्रीय नृत्य उत्सवात भाव खाऊन गेले.
दरम्यान, शैक्षणिक, कला, क्रीडा बौद्धीक स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा यावेळी बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. स्कूल टॉपर, त्रिजल बावणे, सर्वगुणसंपन्न विद्यार्थी कपील चव्हाण व प्रगती पवार यांना विशेष पारितोषीक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. संचालन कृतिका जनबंधू, शरयू कावळे, श्रद्धा मरकाम, ऋतूजा qसगटकर या विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविक प्राचार्य बलवीर यांनी मांडले. आभार आर.ए. शामकुवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील समस्त शिक्षक व कर्मचाèयांनी सहकार्य केले.