प्रा.सुभाष बिरादार सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी

0
25

संख/सांगली,दि.07ः- जत तालुक्यातील गुरुबसव विद्यालय  व ज्युनिअर काॅलेज येथील प्रा.सुभाष मल्लकाप्पा बिरादार यांची निवड सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थाच्या संचालकपदी झाली असून सभासदांच्या हिताकरीता आपण काम करणार असल्याची ग्वाही बेरार टाईम्सशी बोलतांना दिली.तत्कालीन संचालक बाबूराव खवेकर सेवानिवृत्त झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.त्या रिक्त जागेवर त्यांची निवड करण्यात आली.नूतन सदस्य प्रा. सुभाष बिरादार यांचा सत्कार अध्यक्षा संगीता लाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पॅनेलप्रमुख एच.के.होर्तीकर,उपाध्यक्ष तानाजी  गायकवाड, सचिव संभाजी लक्ष्मण माने,गणपती शेवाळे, शिवाजी देसाई, रमेश बाबूराव लाड, विलास यमगर, कुमार माने संजय वांगेकर, तज्ञ संचालक सुभाष सावंत, मुख्य व्यवस्थापक शिवप्रसाद हिरेमठ व सर्व संचालक उपस्थित होते. “सभासद सर्व अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे.संस्थेचा पारदर्शी कारभार व सभासद हित जपण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे”असे आश्वासन नूतन संचालक प्रा सुभाष बिरादार यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना दिले.