स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थ्यींनी प्रयत्न करावे-अॅड जाधव

0
24

संख/सांगली,दि.07 : विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पाहावेत.झोपेत पडणारे स्वप्न हे खरे स्वप्न नसतात. जे स्वप्न झोपू देत नाहीत ते खरे स्वप्न असतात.ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत.  विद्यार्थ्यांनी देशाच्या विकास  कार्यास हातभार लावावा असे आवाहन अजिंक्यतारा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अॅड प्रभाकर भाऊ जाधव यांनी केले. ते जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) जिल्हा परिषेदेच्या शाळेच्या इयत्ता 4 थीच्या निरोप सभारंभ कार्यक्रमात बोलत होते प्रास्ताविक दिलीप वाघमारे यांनी केले .शेतकरी श्रीशैल बसगोंडा यळझरी यांनी शाळेतील झाडे जगवी म्हणून शाळेत मोफत टँकरनी पाणी दिले आहे त्यांचा सत्कार अॅड प्रभाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

अॅड जाधव पुढे म्हणाले, झोपेत पडणारे स्वप्न हे खरे स्वप्न नसतात तर जे स्वप्न झोपू देत नाहीत ते खरे स्वप्न असतात.माझ्या आईने लहानपणी विमानाचे निरीक्षण करताना म्हंटले तू मोठा झाल्यावर विमानात बसशील आणि ते स्वप्न लहानपणी मी बघितले होते.आज मी अनेक देशात विमानाने फिरलो. अॅड प्रभाकर जाधव यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केली.व शाळेतील वर्षाखेरच्या दिवशी विद्यार्थायांची १००% उपस्थिती,शाळेतील विविध उपक्रम पाहून  शिक्षक दिलीप  वाघमारे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच बालवक्त्या सुजाता कुंडले .तिने गुरू आणि शिष्यांचे नाते दृढ आहे.याला मोठी परंपरा असून ते याठिकाणी उत्तमरीत्या जपले जाते.आणि ते जपल्यास विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर समाज आणि राष्ट्रहितास हितकारकच ठरते असे सांगितले. यावेळी प्रा के. एस.ईटेकर, प्रा पी. व्ही. वठारे, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाअध्यक्ष दिंगबर सावंत ,सुजाता कुंडले यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले.यावेळी माजी केंद्र प्रमुख के.बी.पुजारी,श्रीशैल यळझरी ,  दिगंबर सावंत, तलाठी विशाल उदगेरी,वैभव सुर्यवंशी जत,केरुबा गडदे,मारुती गडदे,प्रकाश बाबर, आण्णाप्पा कोरे,कविता कोरे, आप्पासो मोटे,अधिक कोकरे,आप्पासाहेब गडदे,धर्मा कोकरे,शालू गडदे,निंगाप्पा वज्रशेट्टी,शोभा बाबर, सुजाता कुंडले व पालक उपस्थित होते.सुत्रसंचलन शाम राठोड यांनी केले. आभार मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.