जुनी वडसा येथिल स्मशान भुमीवरिल पडलेल्या शेड ची परस्पर विक्रीची चौकशी सुरु

0
17

देसाईगंज,दि.८ः-देसाईगंज नगर परिषदेंतर्गत जुनी वडसा येथिल काही दिवसापुर्वी वादळाने पडलेल्या स्मशान भुमीचा पडलेला शेड नगर परिषदेच्या गोडाऊन मधून सफाई कर्मचारी ट्रक्टर चालक यांनी संगणमताने हजारो रुपयाची कबाडी परस्पर विकल्याबाबतची मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांनी केल्याने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
देसाईगंज नगर परिषदेंतर्गत इमारती,नाली, रस्ते,नविनीकरण अथवा पुनर्बांधणी दरम्यान तसेच अतिक्रमण धारकाची अतिक्रमण दरम्यान तसेच विद्युत पुरवठा विभागाच्या व पाणी पुरवठा विभागाच्या मोठ्या प्रमाणात कबाडी देसाईगंज नगरपरीषदच्या गोडाऊन मध्ये साठवणुक केल्या जातो. मात्र, सदर कबाडी ची अधिकृत नोंद नसल्याने देसाईगंज नगरपरीषदचा पदावनत झालेला आरोग्य लिपिक व एक सफाई कर्मचारी यांनी या कबाडी वर डल्ला मारुन आपले घर भरल्याचे नगरपालिका कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत.
आता तर देसाईगंज नगरपरीषदचा सफाई कामगार व ट्रक्टर चालक यांनी संगणमत करुन जुनी वडसा येथिल स्मशानभुमीवरिल वादळाने कोसळलेला शेड नगरपरीषदच्या गोडाऊन मध्ये जमा करुन देसाईगंज येथिल स्थानिक कबाडीवाल्याला परस्पर विकुन आरोग्य विभागात कार्यरत ट्रक्टर चालक व सफाई कर्मचारी यांनी मिळालेली रक्कम आपसात वाटणी केली असल्याचे बोलले जात आहे.परस्पर शेड विक्रीची हवा मात्र देसाईगंज नगरपरीषद मुख्याधिकारी तसेच आरोग्य निरिक्षक यांना लागु दिलेली नसल्याचे सांगीतले जात आहे.
जुनी वडसा येथिल स्मशान भुमीवरिल वादळाने पडलेल्या शेड ची परस्पर विक्री करणारे ते दोन ट्रक्टर चालक कोण? व तो सफाई कामगार कोण? याची सखोल चौकशी संबंधीत ट्रक्टर चालक व सफाई कामगार यावर शासकिय मालमत्ता चोरुन परस्पर विक्री प्रकरणात तातडीने कायदेशिर कारवाई करावी तातडीने निलंबीत करावे जेणे करावे अशी जोरदार मागणी केल्या जात असुन मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांनी काल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात प्रतिक्रिया विचारुन हा गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधल्यानंतर नगरपरीषदेत सर्वच विभागाच्या भंगाराची चौकशी सुरु केल्याने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असुन जुनी वडसा येथिल स्मशान भुमीवरिल परस्पर शेड विक्री प्रकरण त्या तिघांना चांगली शेकण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.