अदानी समुहाने ओडीसा सरकारला दिले पुनर्वसनासाठी 25 कोटी

0
19

भुवनेश्वर(वृत्तसंस्था)ः- ओडीसा राज्यात आलेल्या फनी चक्रीवादळामुळे राज्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने अदानी समुहाने नुकसानग्रस्त भागाच्या व लोकांच्या पुनवर्सनासाठी मदतनिधी म्हणून २५ कोटी रुपयाचा धनादेश ओडीसाचे मुख्यमंत्र नविन पटनायक यांना अदानी पोर्ट व स्पेशल एकानाॅमी झोन चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जनजिवन विस्कळीत झाले असून कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी राज्यसरकारला आर्थिक सहकार्याची गरज असल्यामुळे सामाजिक दायित्व या भूमिकेतून अदानी समुहाच्यावतीने हा निधी देण्यात आल्याची माहिती अदानी समुहाचे व्यवस्थापक संचालक गौतम अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.ओडीसा राज्यातील हल्दीया व  पारादिप येथे अदानी पोर्टचे काम असून धामरा पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिकार्यानी फनी चक्रीवादळाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाना भेटून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.सोबतच सरकारलाही पुनर्वसनाच्या कार्यात अजून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.कंपनीच्यावतीने चक्रीवादळाने बाधीत भागात भोजनासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरवात करण्यात आली आहे.