ब्राम्हण समाजातील महिलांनी उद्योगक्षेत्रात पुढाकार घ्यावा – डॉ सुधा जोतिषी 

0
22
गोंदिया,दि.08 – ब्राम्हण समाजाने आपल्या ज्ञानाचा उपयोग सदैव सर्व समाजाच्या प्रगतीसाठीच केला आहे. ब्राम्हण नेहमीच उच्चपदावर राहिले आहेत. मात्र व्यवसायात आम्ही दिसत नाही. विशेषत: महिलांनी सामाजात पुढे येणे गरजेचे आहे. इच्छाशक्तीने हे सर्व शक्य आहे. देशातील पन्नास टक्के लोकसंख्या हि महिलांची असून त्या पुढे आल्यास निश्चितच त्यांचा कुटुंबाचा व देशाचा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी आजच संकल्प करून आपल्या प्रगतीचा मार्ग सशक्त करावा.  या  महिला सशक्तीकरणासाठी पुरुषांची साथ महत्वाची  असल्याचे प्रतिपादन वर्धा येथील शासकीय महात्मा गांधी रूरल इन्स्टिटयूटच्या वरिष्ठ वैज्ञानिक व शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुधा ज्योतिषी यांनी प्रमुख अतिथी म्हणून केले.
त्या ७ मे रोजी सिव्हिल लाईन येथील महिला मंडळ सभागृहाच्या परिसरात आयोजित समग्र ब्राम्हण सभेच्या परशुराम जन्मोत्सव निमित्त स्व.पं.शंकरलाल शर्मा स्मृती सत्कार समारोह प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.  समग्र ब्राम्हण सभेचे संयोजक प्रा.निलेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ रेल्वे अधिकारी पं.दिलीप कार प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.ज्योतिषी यांनी आजच्या परिस्थितीत सर्व ब्राम्हणांना प्रांतवाद व भाषावाद बाजूला सारून एकत्रित येऊन समाजातील पुढच्या पिढीसाठी उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी पुढाकार घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.निलेश चौबे यांनी प्रास्ताविक केेले .याप्रसंगी स्व पं शंकरलाल शर्मा यांच्या स्मृतीमध्ये समाजातील वरिष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक व प्राचार्यांचे सत्कार करण्यात आले. यात पं.रमेशचंद्र शुक्ला, पं.अमितकुमार वाजपेयी, डॉ.राजश्री धामोरीकर, डॉ.विणा लोहित, सुशिला मिश्रा, पं.सुरेश शुक्ला, प्राचार्य बी.आर.शर्मा, प्राचार्य हरीषभाई त्रिवेदी, प्राचार्य रूपा मिश्रा, प्राचार्य प्रदिप गाडे, प्राचार्य पंकज शर्मा, प्राचार्य सारीका देशपांडे, प्राचार्य नरेंद्र मिश्रा यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पं.सिध्दार्थ व्यास कर्नाटक, मनिषकुमार शर्मा एडीईएम रेल्वे, भिकम शर्मा यांनी कार्यक्रमाला भेट देवून परशुराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच समग्र ब्राम्हण सभेतर्फे डॉ.सुधा ज्योतिषी व दिलीप कार यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन अतुल दुबे व जयंत शुक्ला यांनी केले तर आभार अ‍ॅड.अनंत दिक्षित यांनी मानले. स्वस्ती वाचन पं.नरेंद्र शुक्ला व पं.शैलेश झा यांनी केले.