टॅंकरमुक्त गोंदिया जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा

0
26
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.09- जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने आजच्या घडीला पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.जिल्ह्यातील जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.दुसèया टप्प्यात १४३ तर तिसèया टप्प्यात ३९८ गावे व १५३ वाड्यात पाणी टंचाई आढळली. या ६९४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच आहे.तर राज्यात टॅंकरमुक्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातही आता टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.तरीही जिल्हाप्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत यावरुन प्रशासकीय अधिकारी हे फक्त देखाव्यासाठी राजकीय नेत्यासोंबत हातमिळवणी करुन पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन करीत आहेत की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१७-१८ या वर्षात दोन कोटी ३३ लाख ४९ हजार रूपयांचा निधी देण्यात आला होता. परंतु यातील २ कोटी १९ लाख ३६ हजार रूपये खर्च करण्यात आले होते. तर १४ लाख १३ हजार रूपये खर्च केलेच नाही. सन २०१८-१९ करीता महसूली क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांचे वीज देयक अदा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला शासनाने ६२ लाख ३ हजार रूपये दिले होते. परंतु त्यातील २२ लाख ३६ हजारच खर्च करून ३९ लाख ७६ हजार रूपये खर्च केलचे नाही.गेल्यावर्षीही 219 गावात पाणी टंचाईचा आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेच्यावतीने काम करण्यात आले परत अजून यावर्षीही आकडा वर पोचला आहे.यावरुन पाणीटंचाई ही फक्त कागदोपत्री करुन पैशाच्या पाणी मुरविला जातेय की काय अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.गोंदिया शहरासह,गोरेगाव नगरपंचायतमध्ये 2 टँकर,गोरेगाव तालुक्यातील सोनी येथेही टॅंकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागला आहे.तीच परिस्थिती तिरोड्यातील काही भागाची आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
 गोंदिया शहराला केवळ एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे.वैनगंगा नदीतील पाणी आटल्याने गोंदिया शहराला पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्यातच गोरेगाव येथेही पाण्याची समस्या निर्माण झाल्याने येथील पुर्नवसीत श्रीरामनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.तेथील नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे.तर जिल्ह्यात जलस्वराज्य प्रकल्प राबविलेल्या गावातील विहिरीतील पाणी सुध्दा आटले आहे. जिल्हा नियोजन समितीने यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ कामे करण्यासाठी निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निवारणार्थ कामे वेळेत सुरू झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
देवरी तालुक्यातील बोरगाव (शिलापूर) येथे नळ योजना विहिरीजवळ नवीन विंधन विहिर तयार करण्यात येणार आहेत. यासाठी २७ लाख २० हजार ३०० रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सालेकसा तालुक्यातील लटोरी आणि परिसरातील ३० गावांना पाणी पुरवठा करणारी योजना पूर्णत: बंद पडल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली मतदारसंघात  टंचाई बैठक
जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड,पिपरी,बौध्दनगर,पुतळी,दोडकेजांभळी गावांना भेंटी देवुन ग्रामपंचायत कार्यालयात पाणी टंचाई परीस्थीतीचा आढावा घेतला