सामूहिक विवाह सोहळा सर्वधर्मीयांना जोडण्याचा उत्तम मार्ग-अग्रवाल

0
9

गोंदिया दि. ०९ : : सर्वप्रथम आपण भारतीय असून याच दृष्टिकोनातून कामठा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावर होणाऱ्या खर्चाची मोठी बचत होते. तसेच सर्वधर्मीयांना जोडण्याचे हा एक उत्तम मार्ग आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात वधू-वराचे पालक आपल्या मुला मुली लग्न लावून देऊन पुण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.सर्वधर्मीेय सामुहिक विवाह सोहळ्यात ७२ जोडपी विवाहबध्द झाली. या जोडप्यांना उपस्थित मान्यवरांनी आशिर्वाद दिले. सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांना शासनाच्या शुभमंगल योजनेतंर्गत अनुदान तसेच ट्रस्टतर्फे संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आली.
ते प्रताप मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्टतर्फे गोंदिया तालुक्यातील कामठा येथे अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजनप्रसंगी बोलत होते. या वेळी प्रामुख्याने खा.प्रफुल्ल पटेल, आ.परिणय फुके, माजीे मंत्री नाना पंचबुध्दे जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, उमादेवी अग्रवाल, माजी आ.दिलीप बन्सोड, केशव मानकर, भैरसिंग नागपुरे, खोमेश रहांगडाले, हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी माजी. जि.प.विजय शिवणकर, उषा मेंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे,प्रेमसागर गणवीर, राजेश नंदागवळी, सहसराम कोरोटे, रमेश अंबुले, अ‍ॅड.के.आर.शेंडे, लहरी आश्रमचे तुकड्याबाबा खरकाटे, झामसिंग बघेले, पृथ्वीपालसिंग गुलाटी, सी.ए.विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, अशोक लंजे, नितीन पुगलिया, सीमा भुरे, नामदेव किरसान, धनलाल ठाकरे, यादनलाल बनोटे, सपना अग्रवाल,विशाल अग्रवाल,प्रफुल अग्रवाल उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, प्रताप मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारीत आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. अशात त्यांना मुलीच्या विवाहासाठी कर्ज काढावे लागते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यामातून मुलीच्या विवाह करण्याची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. दरवर्षी सामुहिक विवाह सोहळ्यात शेकडो जोडपी विवाहबध्द होत असून या सामुहिक विवाह सोहळ्याला भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे.

खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले आमदार अग्रवालांच्या पुढाकाराने आयोजित सामुहिक विवाह सोहळा विवाहासाठी होणाºया पैशाच्या उधळपट्टीला लगाम लावण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रताप मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्ट मागील १५ वर्षांपासून सातत्याने या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन समाजहित आणि पुण्याचे काम करीत आहे. या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यामुळे समाजाला जोडण्याचे उत्तम काम केले जात आहे. यामुळे खºया अर्थाने सामाजिक कार्य केले जात असल्याचे सांगितले. आ.परिणय फुके यांनी सुध्दा विधानभवनात अग्रवालांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी आणि विकास कामे खेचून आणण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. विविध योजनांच्या माध्यमातून जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे काम ते करीत आहे. प्रताप मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्ट आणि त्यांच्या पुढाकाराने आयोजित सर्वधर्मीय सामुहिक विवाह गोरगरीब माता पित्यांसाठी फार मदतीचा ठरत असून निश्चित हे महान कार्य असल्याचे सांगितले. या वेळी नाना पंचबुध्दे, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, हेमंत पटेल यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. जि.प.अध्यक्ष सीेमा मडावी म्हणाल्या आ.गोपालदास अग्रवाल आणि प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित सामुहिक विवाह सोहळा हा खºया अर्थाने सामाजिक उपक्रम असून तो सातत्याने राबविला जात आहे. या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढविण्यास मदत होत असून खर्चाची सुध्दा मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी प्रास्तविकातून ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणार विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होणाºया जोडप्यांना शुभमंगल योजनेतंर्गत १० हजार रुपयांचे अनुदान तसेच ट्रस्टतर्फे संसार उपयोगी साहित्य भेट दिले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले तर आभार ट्रस्टचे सचिव प्रफुल्ल अग्रवाल यांनी मानले.
कामठा येथे आयोजित सर्वधर्मीेय सामुहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पुणे येथील लावणी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित विविध कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते.सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात विविध जाती धर्माचे जोडपी विवाहबध्द झाले. ढोले ताशांच्या गजरात आणि हिंदू आणि बौध्द धर्म पध्दतीने त्या त्या समाजाची जोडपी विवाहबध्द झाली.