अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

0
18

मुंबई,दि. १०- मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा अडसर दूर झाला. पुढील ३ दिवसांत अजोय मेहता पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत. अजोय मेहता यांनी 2015 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल 4 वर्ष त्यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली. 27 एप्रिल 2019 रोजी अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची 4 वर्ष पूर्ण केली. मुंबई महापालिकेच्या कारभारात सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त आहे. यापूर्वी सदाशिव तिनईकर यांनी 1986 ते 1990 मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांनी 3 वर्षे 9 महिने आणि 8 दिवस इतका कालावधी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर पूर्ण केला होता. अजोय मेहता यांनी सदाशिव तिनईकरांनंतर हा मान पटकावला.