भुसावळ ते नागपूर मार्गांवर मेमू गाडी धावणार

0
50

भुसावळ,दि.11 – मध्य रेल्वेंतर्गत येत्या सहा महिन्यात भुसावळ रेल्वे मंडळाकडून भुसावळ ते नागपूर आणि अमरावती ते वर्धा अशा या दोन मार्गांवर मेमू गाडी चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठीच्या प्रक्रियेला रेल्वे प्रशासनाने वेग दिला असून या मेमू गाडी चालविण्यासाठी १७ लोको पायलटंना २१ दिवसांच्या प्रशिक्षनांसाठी गुजरातमधील बडोदा येथे पाठविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी काढून त्या जागेवर मेमू गाडी चालवण्यात येणार आहे.या मेमू गाडीला दोन्ही बाजूने इंजिन म्हणजेच लोको कब असेल. यामुळे गाडी स्थानकावर आल्यावर इंजिनची दिशा बदलण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. मेमुला १२, तर पॅसेंजर गाडीला १२, १४ किंवा १६ डबे असतात. पॅसेंजर गाडीत झोपण्यासाठी बर्थ असतात मात्र मेमू गाडीत बर्थची व्यवस्था नाही. पॅसेंजर गाडीच्या इंजिनापेक्षा मेमुचा वेग जास्त असतो. त्यामुळे हि गाडी नियोजित वेळेत स्थानकावर पोहोचेल. मध्य रेल्वेच्या पाच विभागांशी तुलना करता भुसावळात मेमू चालवण्याचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे मेमू गाडीचे परीक्षण हे भुसावळ येथेच होणार आहे.प्रशिक्षणावरुन लोको पायलट परत आल्यानंतर दोन्ही मार्गावरील पॅसेंजर बंद करून तेथे मेमू गाड्या सुरु करण्याची प्रक्रिया आणखी गतिमान होईल असा विश्वास भुसावळ रेल्वे मंडळाने व्यक्त केला आहे.