मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

शिक्षणविशेषज्ञ रोहित शर्माच्या पुढाकाराने वेस्ट ऑफ इंग्लंड विद्यापीठाचा एक आऊटरिच कार्यक्रम

मुंबई,दि.11ः-येथील द ललित या पंचताराकिंत हाॅटेलमध्ये शिक्षणविशेषज्ञ रोहीत शर्मा यांच्या पुढाकाराने एका शिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यात  यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट ऑफ़ इंग्लड (UWE) च्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतला.या परिषदेचा मुख्य उद्देश ऑनलाइन अभ्यासक्रमाची उपलब्धता, यूनाइटेड किंगडम येथील शिक्षण आणि तेथील मास्टर्स प्रोग्राम सह वर्कप्लेस तसेच तिथे अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे हा होता.

या परिषदेत माहिती देतांना द यूनिवर्सिटी ऑफ द वेस्ट इंग्लंडचे बिजनेस डेवलपमेंट अधिकारी आणि सल्लागार रोहित शर्मा म्हणाले की, “आपण ज्याप्रमाणे विचार करतो आणि त्याचे रूपांतर कामात करतो.त्यात बदल करण्यासाठीच या कॉन्फरन्सचे आयोजन आहे. आपण आपल्या क्षमतेत सुधारणा करू शकतो जेणेकरुन सर्व लोकांना चांगली मदत मिळेल तसेच आम्ही आमचे उद्दिष्ट्ये साध्य करू  हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आम्ही बाजारात होत असलेल्या बदलाबद्दल जागरूक आहोत.आम्ही या घडलेल्या बदलांबद्दल अत्यंत संवेदनशील देखील आहोत. आपण आतापर्यंत जे स्थान प्राप्त केल आहे त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपण ज्या दिशेने जात आहोत त्याबद्दल आपल्याला आनंद ही असायला हवे.संशोधन करणे, ग्राहक सेवा, धोरणात्मक नियोजन आणि मार्केटिंग धोरणे यांसारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ही कामगिरी करून इतिहास देखील घडविला आहे.शर्मा पुढे म्हणतात की, “आम्ही अश्याच प्रकारे प्रगती करत राहू, परिस्थितीनुसार स्वतःला मोडू, सतत कार्य करत राहू आणि प्रतिसाद देत राहू.”संपूर्ण परिषदेदरम्यान, विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करून सर्व गोष्टी ऐकत, त्यात भाग घेतला आणि UWE (ब्रिस्टल) अधिक सुवर्ण बनविण्यात मदत केली. रोहित शर्मा म्हणाले, “भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. खरोखर जागतिकीकृत जगात, इंग्लंडच्या विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू शकतो.”

Share