१४ व्या वित्त आयोग निधीची चौकशी करा-उपसरपंचाची मागणी

0
17

सडक अर्जुनी,दि.12ः- गावाच्या विकासाकरिता शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाची निधी थेट ग्रामपंचायतला प्राप्त होते. या निधीचा वापर गावाच्या विकासाकरिता करावयाचा असून तो निधी कशाप्रकारे खर्च करता येईल याकरिता शासकीय परिपत्रक असतो. किती निधी कुठे खर्च करायचा याचे नियोजन आवश्यक असते; परंतु काही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे या निधीचा उपयोग योग्यप्रकारे होताना दिसत नाही. तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायतमध्ये १४ व्या वित्त आयोगाचा निधी नियमबाह्य पद्धतीने सरपंच व सचिवांनी खर्च केल्याचे दिसून आले. खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्यासंदर्भात कोदामेडी येथील उपसरपंच व इतर काही सदस्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
सविस्तर असे की, कोदामेडी ग्रामपंचायत येथे १४ व्या वित्त आयोगाच्या फंडामध्ये लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होता. शासकीय दिशानिदेर्शानुसार व ग्रामपंचायत पदाधिकार्?यांच्या चचेर्अंती खचार्चे नियोजन आखण्यात आले. आवश्यक त्या वस्तूच्या खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या. व्यापारी वगार्ने आपल्या सोयीनुसार ग्रामपंचायतला कोटेशन पाठविले. सदर सर्व वस्तूंचे कोटेशन हे ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये उघडण्यात आले व कमी किंमतीच्या कोटेशनला ग्रामपंचायतीच्यावतीने मान्यता देण्यात आली; परंतु मासिक सभेमध्ये मंजूर झालेल्या पुरवठाधारकांकडून आवश्यक सामान न बोलविता सरपंच व सचिवांनी आपल्या मजीर्तील पुरवठाधारकांकडून सामान मागविला. पुरविण्यात आलेला सामान अत्यंत निकृष्ट दजार्चा आहे. ग्रामपंचायतच्या मासिक सभेने पुरवठाधारकांपैकी कमी किंमतीचे कोटेशन मंजूर करणे हे अपेक्षित होते; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून सरपंच व सचिवांनी ग्रा.पं. पदाधिकार्?यांना विश्‍वासात न घेता मनमजीर्ने काम केले. विशेष म्हणजे, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून शाळेकरिता काही निधी देणे आवश्यक होते. गटग्रामपंचायत असल्याने कोदामेडी व केसलवाडा अशा दोन जि.प. शाळा येतात. त्यामुळे प्रत्येकी ३0 हजार रुपये देणे आवश्यक होते; परंतु शाळांना प्रत्येकी २0 हजार रुपये देऊन ग्रा.पं.च्या खात्यातून ६0 हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे या निधीची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार कोदामेडी ग्रा.पं.चे उपसरपंच आसाराम लांजेवार, सदस्य निशांत राऊत, आनंदाबाई झाडे, सुलोचना मुनिश्‍वर, प्रमिला मरस्कोल्हे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांना केली. तसेच याची प्रतिलिपी सडक अजुर्नीचे खंडविकास अधिकारी यांना देण्यात आली.