मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

नक्षलवाद्यांनी जाळले टँकर, मिक्सर मशीन आणि रोड रोलर

गडचिरोली दि.१३: एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावरील पंतप्रधान ग्राम सड़क योजनेच्या  कामावरील वाहनाना नक्षल्या़नी आग लावल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यामध्ये टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य साहित्याचा समावेश आहे.यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदाराला रस्ता बांधकामाचे कंत्राट असल्याची माहिती समोर आली आहे.जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याचे माहिती आहे.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे

Share