आमगाव,दि. १४- ग्राम पंचायतच्या संगणक परीचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोग निधीतून न देता शासनाकडून देण्यात यावे या आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सरपंच सेवा संघाच्या वतीने १३ मे रोजी खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले. ग्राम पंचायत १४ वा वित्त आयोगात संगणक परिचालकाच्या मानधनाचा उल्लेख नसुन सुद्धा २०१८-१९ चे १४ व्या वित्त आयोग निधीतून सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकाचे मानधन राज्य सरकारने सरळ संग्राम सेवा सुविधा केंद्राला परिपत्रक काढुन ग्रामपंचायतचा निधी वगळूनग्रामपंचायतची दिशाभुल केली.त्यामुळे गावातील विकासात्मक कार्यात निधी अपुरी पडते.या करीता १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन मानधन न देता शासनाने ग्रामपंचायतच्या इतर कर्मचारी प्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा.अशी रास्त मागणी सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल ब्राम्हणकर, गोंदिया जिल्हा संघटक नरेंद्र शिवणकर,उपाध्यक्ष उषा भांडारकर,सचिव खेमराज उईके,कोषाध्यक्ष कविता अमोल मेंढे,हंसराज चुटे,त्रिवेणी पटले,नामदेव दोनोडे,केशरीचंद बिसेन आदींनी केली आहे.