पाणी टंचाई उपाययोजना १४ नविन विंधन विहिरींना मान्यता

0
20

गोंदिया,दि.१४.: जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन आमगाव तालुक्यातील ७ गावे/वाड्यामध्ये व देवरी तालुक्यातील ७ गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण १४ नविन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
आमगाव तालुक्यातील कवडी येथे देवराम पटले यांचे घराजवळ, नंगपूरा येथे बेनीराम राऊत यांचे घराजवळ, बोरकन्हार येथे शेखर भोयर यांचे घराजवळ, भोसा येथे बंडू शिवणकर यांचे घराजवळ, महारीटोला येथे घनश्याम मेंढे यांचे घराजवळ, करंजी येथे बाबुलाल हुकरे यांचे घराजवळ, बासीपार येथे गुणवंताबाई सयाम यांचे घराजवळ नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.
देवरी तालुक्यातील कनसाऊटोला येथे मालकन फुंडे यांचे घराजवळ, चारभाटा येथे कृष्णा भोंगाडे यांचे घराजवळ, मकरधोकडा येथे गिरधारी पंधरे यांचे घराजवळ, शेरपार येथे पंचराम मडावी यांचे घराजवळ, धमडीटोला येथे ओमप्रकाश सियाम यांचे घराजवळ, धवलखेडी येथे बाबुलाल साखरे यांचे घराजवळ, डवकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अशा एकूण १४ ठिकाणी १५ लक्ष २३ हजार ३६८ रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.