पातागुडम येथे पाण्याची टंचाई

0
16

सिरोंचा,दि.15ः- गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम गावातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईमुळे त्रास सहन करावा लागत आहे.शेजारून वाहणार्या इंद्रावती नदीचेही पात्र कोरडे पडू लागले आहे.30-40 घर असलेल्या या गावात तीन दिवसातून एकदा पाण्याच्या टॅंकर पोचत आहे.पातगुडमच्या मिडिगुडंम, नादिमिगुडम आणि किनदिगुदम येथे फक्त 5 हातपंप असून तेही निकामी पडले आहेत.मिडीगुडा येथील नागरिकांना नादमिगुडा येथून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाने या गावामंधील पाण्याची टंचाई दुर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.