मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

अवैध सावकारी जाळपोळ प्रकरणातील महिलेचा अखेर मृत्यू

चंद्रपूर,दि.15ः- येथील सरकारनगरमधील अवैध सावकार जसबीर सिंग उर्फ सोनू भाटीया यांनी दि ७ मे रोजी रघुनाथ हरिणखेडे यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर राॅकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात कल्पना रघुनाथ हिरणखेडे व त्याचा मुलगा पीयूष रघुनाथ हिरणखेडे हे दोघे यात गंभीर भाजले गेले. यांच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर १४ मे रोजी पीडित कल्पना हरिणखेडे यांचा मृत्यू झाला.आरोपीला मदत करणार्या पोलीस अधिकार्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.
कर्जाच्या वादातून दि. ७ मे रोजी हरिणखेडे कुटुंबीयांसोबत सावकार भाटीया यांचे भांडण झाले. त्याच वेळी भाटीया यांनी गाडीतील पेट्रोलची बॉटल काढून कल्पना हिरणखेडे व त्याचा मुलगा पीयूष हिरणखेडे यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत आई ६0 टक्के तर मुलगा ४0 टक्के भाजला. या दोघांवर चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे मेयो रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु होता.१४ मे रोजी पीडित कल्पना हिरणखेडे यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्युची बातमी शहरात पसरताच नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. पीडित हे शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते तर आरोपी हा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे हे विशेष.
पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याला शासकीय रुग्णालयात उपचार करायला हवे होते परंतु तसे न करता त्याला पोलिसांनी चिरिमिरीच्या माध्यमातून विशेष सेवा पुरविल्याचा आरोप होत आहे.कल्पना हरिणखेडे यांच्या मृत्यूनंतर शहरातील अवैध सावकारांवर कडक कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया मनसेच्या माध्यमातून येत आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मेयो रुग्णालयात हरिणखेडे दाम्पत्याची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीबद्दल वैद्यकीय अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली. हरिणखेडे दाम्पत्यांला शासनस्तरावरून नियमानुसार आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वस्त केले. या घटनेची सखोल चैकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपायायोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

Share