‘पांडुरंग एक शोध, अर्थ आणि अन्वयार्थ’चे प्रकाशन

0
17

गोंदिया,दि.15ः-कवी बापू इलमकर यांचा पांडुरंग एक शोध, अर्थ आणि अन्वयार्थ हा ग्रंथ म्हणजे नवा शोध व समाजाला नवा बोध देणारा ग्रंथ होय, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी कवी युवराज गंगाराम यांनी केले. स्थानिक संथागार मरारटोली येथील बुद्धिस्ट समाज संघ यांच्या विद्यमाने सदर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आंबेडकरी कवी युवराज गंगाराम व ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी ग्रंथावर भाष्य केले. विशेष पाहुणे म्हणून भीमराव गणवीर, हृदय चक्रधर, माणिक गेडाम, मिलिंद रंगारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनय लाऊत्रे यांनी केले.आभार कालीदास सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद खापर्डे, रमेश रामटेके, यशवंत बोरकर, अभिजित इलमकर, प्रा. राजहंसा मेर्शाम तसेच संथागारच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.