मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

लाच मागणार्‍या वीज कर्मचार्‍यास अटक

पवनी,दि.15ः-विद्युत मिटरमध्ये छेडछाड केल्याची खोटी तक्र ार करीत कारवाई न करण्यासाठी १ हजार ८00 रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण कंपनीच्या वरीष्ठ तंत्रज्ञास भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई पवनी येथील वीज कार्यालयासमोर करण्यात आली.
विनोद किशनराव शिवणकर (३७) रा. पवनी असे वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. यातील तक्रारदारांच्या लहान भावाच्या नावाने असलेल्या विद्युत मिटरमध्ये छेडछाड केली असल्याची खोटी तक्र ार करतो, असे सांगून कारवाई न करण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ विनोद शिवणकर याने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ हजार ८00 रुपये देण्याचे ठरले. ६ मे रोजी सापळा कारवाईदरम्यान पवनी येथील विज कार्यालयाच्या बाहेर ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दिसून आल्याने शिवणकर याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Share