मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

देवरी आमगाव रोडवर मोटारसायकलची सामोरासमोर धडक -1 ठार

देवरी,दि.15 – देवरीपासून उत्तरेस सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील चौरागडे बगीच्या नजीक नवनिर्मित देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन मोटार सायकलींमध्ये सामोरासमोर झालेल्या घडकेच 1 जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.15) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मृतामध्ये विजय भोजराज चौधरी (वय 22) राहणार सालेगाव, तालुका देवरी याचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये मंगेश नामदेव कापसे (वय 25) राहणार भागी (चिचगड) , तालुका देवरी आणि प्रियंका तेजराम वट्टी (वय18) राहणार सालेगाव यांचा समावेश असून योगेश नामदेव कापसे (वय 22) राहणार भागी चिचगड आणि प्रमिला तेजराम वट्टी (वय 55) राहणार सालेगाव हे जखमी झाले आहेत. जखमींवरी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगेश हा आपला भाऊ योगेश यासह देवरीकडून आमगावच्या दिशेने आपल्या दुचाकी (क्र. एमएच 35 टी 1809) ने जात होता. तर मृत विजय हा वट्टी कुटुंबातील मायलेकींना घेऊन आपल्या दुचाकीने (क्र. एमएच35 एएफ 2748) देवरीच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनांमध्ये चौरागडे बगिच्या नजीक सामोरासमोर जोरदार धडक झाली. घटनेची नोंद देवरी पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Share