मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने कुनघाडा रै येथे संभाजी महाराज जयंती साजरी

चामोर्शी, दि. १५:- राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,विद्यार्थी युवक संघटना व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुनघाडा रै येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३६२ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यार्थी युवक संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक भांडेकर हे होते.पाहुणे म्हणून मधुकर टिकले ,राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे पंकज खोबे, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष मंगेश वासेकर, संभाजी ब्रिगेडचे सचिव रमेश कोठारे, वीर भगतसिंघ परिषदचे संघटक हर्षद भांडेकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुशांत कुनघाडकर, अविनाश सातपुते, राहुल वडेट्टीवार, मंगेश गव्हारे, गणेश मडावी,भूषण नैताम,नागेश वासेकर, गणेश भोयर, निलेश देवताळे, महेश वासेकर,तुषार वैरागडे,मनोज कोमलवार, गुंजन भांडेकर, अंकुश खोबे,पंकज गव्हारे यश गण्यारपवार,रोमित वडस्कर, पवन खांडेकर,प्रमोद कुनघाडकर, कर्णविर टिकले,दीपक भांडेकर, काशीनाथ कुनघाडकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर व्दिपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
भांडेकर अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी बुद्धिमान आणि नीतिमान राजे होते. त्याच्यात शूरता आणि निर्भीन पणा हा सर्वोत्तम गुण होता. छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. रणांगणात तसेच राजनितीमध्ये देखील ते निपूण होते. बुध्दभुषण या संस्कृत भाषेतून लिहलेल्या ग्रंथातून समाजाला मोलाचा उपदेश त्यांनी दिला आहे.मोगल साम्राज्य विरुद्ध लढा देतांना एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी राजे धर्मभेद न करता सर्वांना समानतेची वागणूक देणारे होते.यावेळी मधुकर टिकले ,भूषण नैताम मंगेश वासेकर, यांनीही संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन मंगेश वासेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज खोबे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share