३१ मे पूर्वी स्कूल बसची तपासणी करून घेण्याचे आवाहन

0
21

वाशिम, दि. १५ : नागपुर उच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करावयाची आहे. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूल बस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबीरामध्ये प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी. तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा.

स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.  वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे. होणाऱ्या कारवाईबाबत स्कूल बस मालक स्वत: जबाबदार राहतील. जिल्ह्यातील सर्व स्कुल बस मालकांनी आपल्या वाहनांची फेरतपासणी दिलेल्या मुदतीत करुन घ्यावी व तसा तपासणी अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.