मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बेघर नागरिकांसाठी आरोग्य शिबिर

गोंदिया,दि. १५ : :- छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संविधान बचाव कृती संघाच्या वतिने स्थानिक गुजराती शाळेसमोर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत तसेच नगर परिषद मार्फत सुरु असलेल्या बेघर नागरिकांचा निवारा “रैन बसेरा” जुने धोटे सुतिका गृह येथे आरोग्य शिबिर व निशुल्क औषधी वितरण कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला  केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय चिकित्सक डॉ. राजेन्द्र वैद्य, आयोजन कमेटी संविधान बचाव कृती संघाचे संयोजक पत्रकार अतुल सतदेवे, नगर परिषद राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक धनराज बनकर, नगर परिषद कौशल्य उद्योजकता उपक्रम व्यवस्थापक सुनंदा बिसेन, सामाजिक कार्यकर्ते सुभाष मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करण्यात आले.छत्रपती शिवरायानंतर स्वराज्य टिकविण्यासाठी व वाढवण्यासाठी शत्रुंशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे परमवीर योद्धा, बुद्धिमान, आठ भाषेत पारंगत साहित्यिक, शाक्तपंथीय, मोठ्यांचा मान राखणारे, रयतेच्या कल्याणासाठी झटणारे अशा शब्दातुन संभाजी महाराजांचा जयजयकार करुन अभिवादन करण्यात आले.त्यांचा आदर्श घेऊन, न थांबता समाजाच्या कल्याणासाठी नेहमी झटत राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मान्यवरानी याप्रसंगी केले.या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात 20 बेघर लाभार्थींची तपासणी करण्यात आली. तसेच नि:शुल्क औषधी वितरित करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेकरिता निवारा व्यवस्थापक हेमंत मेश्राम, केयर टेकर पूर्णप्रकाश कुथेकर, रविन्द्र बोरकर, राजेन्द्र लिल्हारे आदिनी परिश्रम घेतले.

Share