फवारा चौकात तसेच सराफा लाईन चालला बुलडोजर;देसाईगंज नगर पालिकेची कारवाई

0
22

देसाईगंज दि १५;दिवसेंदिवस वाहनसंख्या व जिल्हयामध्ये सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या देसाईगंज शहरात वाढता अतिक्रमण चिंतेचा विषय बनलेला आहे.देसाईगंज नगर पालिकेने अतिक्रमण प्रकरण गांभिर्याने घेतले असुन आज(दि.१५) फवारा चौकात तसेच सराफा लाईन मधील वाढलेला अतिक्रमण काढल्याने शहरातील बेकायदेशिररित्या केलेल्या अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे पार्किंग व वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. देसाईगंज शहरातील मुख्य फवारा चौकात वाढलेल्या अतिक्रमाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. तसेच सराफा लाईन मध्ये वाढत्या ग्राहकांमुळे ये-जा करणाय्रा जनतेला फारच त्रास सहन करावे लागत होते, याबाबत देखिल आजुबाजुच्या त्रासलेल्या सराफा दुकानदारांनी तक्रारी केल्याचे सांगीतले जात आहे.
अजगरी विळख्यात सांपलेल्या फवारा चौकात तसेच सराफा लाईन मध्ये आज देसाईगंज नगर परिषद च्या बांधकाम विभाग,नगर विकास विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज पोसीस स्टेशनच्या पोलीसांकडुन संरक्षण मागुन मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची मोहिम आचारसंहिता असे पर्यंत सुरुच राहणार असल्याचे सांगीतले जात आहे. कुरखेडा- आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अतिक्रमणावर तसेच रेल्वे विभागाच्या भुमिगत पुलापासुन- ब्रम्हपुरी रोडवर तसेच फवारा चौका पासुन ते नैनपुर रोडवर दुतर्फा झालेला अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत असल्याचे सांगीतले जात आहे.

यावर कारवाई होणे अपेक्षित आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातील याचिका क्रमांक १०७९/२००८ मध्ये कल्पना माडावार व इतर तीन , याचिका क्रमांक २३५६/२००८ मध्ये सत्तार रिझवी यांची रजा गेस्ट हॉऊस तसेच याचिका क्रमांक १४३६/२०१६ मध्ये वली हुसैनी या इमारतीना पाडण्याबाबत देसाईगंज नगर परिषद ने स्वत: प्रतिज्ञापत्र दिलेला होता त्यावरुन न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासाठी आदेशीत केले होते परंतु न्यायालयाच्य आदेशाचे पालन करण्यात आले नव्हते परंतु मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके हे न्यायालयाच्य आदेशाचे पालन करुन कायदेशिर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.