अभ्यासाचे पुर्व नियोजन हीच यशाची खरी गुरूकिल्ली-प्राचार्य खुशाल कटरे

0
25

सडक अर्जनी,दि.18:-अभ्यास कसा करावा? लक्षात कसे ठेवावे? शिकविलेल्या विषयांशा चा जास्तीत जास्त सरावाने मस्तिष्कावर ते कसे उमटते? याचे उत्तर विविध उदाहरणाद्वारे समजावत अभ्यासाचे पुर्व नियोजन हीच यशाची खरी गुरूकिल्ली होय असे विचार प्राचार्य खुशाल कटरे यांनी व्यक्त केले. कटरे आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमीक विद्यालय खजरीच्या वतीने आयोजीत वार्षिक निकाल घोषणा कार्यक्रमाच्या अध्यक्षनावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन (दि. 17)खजरी येथील मोठ्या सभागृहात आयोजीत करण्यात आले होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुने म्हणून ग्रा.प.खजरी चे उपसरपंच नरेंद्र देहारी ,पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.उंदिरवाडे ,क.महा.प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर,डी.डी.रहांगडाले,सौ.छायाताई चौव्हाण,राजेश लांजेवार ,सौ.जी.एम.चुटे,एस.ए.बिसेन ,एल.बी.पारधी,प्रा.संजय येडे.प्रा.डी.के.जांभुळकर,प्रा.के.के.तागडे,व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.सुरज रामटेके यांनी सादर केले.या प्रसंगी प्रा.एन.ए.पुस्तोडे,डी.डी.रहांगडाले, यांनी मार्गदर्शन केले व गुणवंताना भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आले.संचालन जी.टी.लंजे व आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले.