नवेगावबांध वनपरिक्षेत्राअंतर्गत बिबट मादी जखमी अवस्थेत आढळले

0
48
filephoto

गोंदिया,दि.18 : नवेगावबांध वनपरिक्षेत्र अंतर्गत बाराभाटी सहवनक्षेत्रातील सिलेझरी नियतक्षेत्रामध्ये येरंडी देवी गावालगत संरक्षीत वन कक्ष क्र.७३० मध्ये एक बिबट (दि.15) जखमी अवस्थेत आढळून  आल्याने खऴबळ माजली आहे.माहिती मिळताच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मौकास्थळी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत जावून पाहणी केली व बिबट जखमी असल्याचे लक्षात आल्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे परवानगीने जखमी बिबट्यास बेशुध्दीचे इंजेक्शन देवून ताब्यात घेतले. वन्यजीव बचावाची कार्यवाही नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी गोंदिया वनविभाग वन्यप्राणी बचाव पथक व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यप्राणी बचाव पथकाचे मदतीने पार पाडली.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी बिबट्याची तपासणी केली असता बिबट मादीच्या (अंदाजे वय एक वर्ष) खांदयावर जखम आढळून आल्याने गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व उपचार केंद्रात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. अशी माहिती उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग, गोंदिया यांनी दिली आहे.