मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना दुष्काळाबाबत निवेदन

नागपूर,दि.18ः- जिल्हा व विदर्भातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर ठोस उपाययोजना कराव्या, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांना शुक्रवारी (१७ मे) निवेदन देण्यात आले.यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, आमदार वीरेंद्र जगताप, अमित झनक, माजी मंत्री रणजीत कांबळे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, रामटेक लोकसभेचे उमेदवार किशोर गजभिये, नतिकोद्दीन खातीब, अतुल लोंढे, नानाभाऊ गावंडे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा गटनेते ( राष्ट्रवादी काँग्रेस) जिल्हा परिषद नागपूर चंद्रशेखर चिखले, जि. प. सदस्या नंदा नारनवरे, कुंदा राऊत, तक्षशिला वाघधरे, अनिल राय व नेते मंडळी उपस्थित होते.
निवेदनात पिण्याच्या पाण्याकरीता विविध उपाययोजना कराव्या, गुरांकरिता चार्‍याच्या छावण्या सुरू कराव्या, टँकरने पाणीपुरवठा करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पिकविम्याचे पैसे द्यावे, सुकलेला संत्रा, मोसंबी व इतर बागांचा योग्य मोबदला द्यावा, रोजगार हमीचे कामे सुरू करावी, पिण्याच्या पाण्याची टंचाईमधील कामाचा निधी जिल्हा परिषदला त्वरीत उपलब्ध करून द्यावा, बोरवेलची खोली कमीतकमी ९0 मिटर करावी तसेच बोरवेल व ट्युबवेलची कामे जलद गतीने करून हातपंप लावावे आदी मागण्यांचे निवेदन दिले.

Share