माओवाद्यांनी गुरूपल्लीजवळ रस्ता अडविला:लाकडी बिट जाळले

0
24

गडचिरोली,दि.१९ : गेल्या दोन दिवसापुर्वी पत्रके घालून माओवाद्यानी आज १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते.त्या पत्रकाची दखल घेत पोलीस प्रशासनानेही बंदोबस्तात वाढ केलेली असतानाच माओवाद्यांनी आज सकाळच्या सुमारास गुरुपल्लीजवळ एटापल्ली-आल्लापल्ली रस्त्यावर झाड तोडुन मार्ग बंद पाडला आहे.माओवाद्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी)येथील वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली.पुराडा वनपरिक्षेत्रातील असून, येडापूर व कुरंडी कुपातील लाकडे तोडून ती वारवी येथील जंगलात ठेवण्यात आली होती. जंगल कामगार सहकारी संस्थांनी ही लाकडे तोडून ठेवली होती. शिवाय एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्त्यांची अडवणूक केली.दरम्यान माओवाद्यांनी रस्ता बंद केल्याने एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणा-या बसेस एटापल्लीतच थांबविण्यात आल्या आहेत.

माओवाद्यांच्या या बंदला गावकऱ्यांनी केला विरोध केला असून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गुरुपल्लीजवळ नक्षल्यानी पाडलेले झाडे बाजूला करत रस्ता केला मोकळा करुन माओवाद विरोधी घोषणा देऊन माओवाद्यांनी लावलेले बॅनर्स जाळल्याची माहिती पोलीस विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.कोरची, भामरागड शहर व या तालुक्यांमधील दुर्गम भागातील बाजारपेठा बंद आहेत. रस्त्यांवरही शुकशुकाट आहे. दरम्यान पोलिसांनी सीमावर्ती भागात हाय अॅलर्ट जारी केला असून, अतिसंवेदनशील २५ पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

माओवाद्यांनी आज १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. बंददरम्यान एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्लीपासून काही अंतरावर माओवाद्यांनी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या ट्रक जवळ झाडे तोडून टाकली. बॅनर बांधून आलापल्ली -एटापल्ली रस्ता अडविला आहे. तसेच भामरागड जवळील पर्लकोटा नदीजवळ बॅनर बांधले आहे. माओवाद्यांनी झाडे तोडून रस्ता अडविलेल्या ठिकाणी बॅनर बांधले आहेत. या बॅनरवर २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीचा उल्लेख केला आहे. नक्षली कमांडर रामको नरोटे आणि शिल्पा धुर्वा यांना गुंडूरवाही येथे खोटी चकमक दाखवून सी – ६० पथकाने ठार केल्याचे बॅनरवर नमुद केले आहे. बॅनर मराठी भाषेतून असल्यामुळे हे कृत्य शहरी माओवाद्यांचे असल्याचे बोलल्या जात आहे. बंददरम्यान माओवाद्विरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे.