पाणी टंचाई उपाययोजना २९ नविन विंधन विहिरींना मान्यता

0
18

गोंदिया दि. २० :: जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २ गावे/वाड्यामध्ये, गोंदिया तालुक्यातील १६ गावे/वाड्यामध्ये व सडक/अर्जुनी तालुक्यातील ११ गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण २९ नविन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील मोरगाव येथे बौध्द विहार परिसर जवळ, सावरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ. गोंदिया तालुक्यातील हेटीटोला (गुदमा) येथे जगतराम हत्तीमारे यांचे घराजवळ, मोरवाही येथे दिनेश कटारे यांचे घराजवळ, शेरकाटोला येथे नान्हुलाल नागवंशी यांचे घराजवळ, छिपीया येथे तेजराम फुंडे यांचे घराजवळ, धामनगाव येथे अनिल पाचे यांचे घराजवळ, बिरसोला येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळ, मरारटोला काटी येथे महेश चौरे यांचे घराजवळ, गरा बु. येथे फुलचंद तांडेकर यांचे घराजवळ, डांगोरली येथे फागुलाल चौधरी यांचे घराजवळ, सितुटोला येथे प्रेमलाल उईके यांचे घराजवळ, हरसिंगटोला येथे श्रीमती पुस्तकला उईके यांचे घराजवळ, धापेवाडा येथे डोबन कवडे यांचे घराजवळ, मुरदाडा येथे मुन्नालाल साळुंके यांचे घराजवळ, पोलाटोला येथे शोभेलाल पटले यांचे घराजवळ, परसवाडा येथे बिहारीलाल पारधी यांचे घराजवळ, अर्जुनी येथे यादोराव बिसेन यांचे घराजवळ.
सडक/अर्जुनी तालुक्यातील राका येथे हनुमान मंदिर परिसरात, कोदामेंढी येथे जुनी मश्जिद जवळ, सौंदड येथे माता मंदिर जवळील परिसरात, डोंगरगाव खा. येथे रमेश कोरे यांचे घराजवळ, सावंगी येथे करण शेंदरे यांचे घराजवळ, फुटाळा येथे श्रीमती जिजाबाई गहाणे यांचे घराजवळ, तिडका येथे मधुकर गुरनुले यांचे घराजवळ, घाटबोरी तेली येथे यशवंत चांदेवार यांचे घराजवळ, बौध्दनगर येथे संत जगनाडे महाराज यांचे घराजवळ, डुंडा येथे लिकन बोपचे यांचे घराजवळ, घोटी येथे श्रीमती उमा तावाडे यांचे घराजवळ अशा एकूण २९ ठिकाणी ३१ लक्ष ५५ हजार ५४८ रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.