स्मिता ठाकरेंच्या ‘मुक्ती कल्चरल हब’ला अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद,फिल्म फॅटर्निटीची पाठींबा

0
22

मुंबई(के.रवी)दि. २० :महिला सशक्तीकरण, एचआयव्ही-एड्स जागरूकता, एलजीबीटीक्यू अधिकार, पर्यावरण संरक्षण आणि इतर अशा वेगवेगळ्या स्थरावर अथकपणे काम केल्यानंतर, पॉवर वुमन आणि सोशल एक्टिव्हिस्ट स्मिता ठाकरे यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. कला आणि संस्कृतीचा प्रसार करण्याचा नवीन भार त्यांनी उचलला आहे. शहराच्या पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक केंद्रांच्या कमतरतेमुळे स्मिता ठाकरे यांनी अंधेरी पश्चिम, मॉडेल टाउन येथे मुक्ती कल्चरल हब चे निर्माण केले आहे. जिथे नृत्य, संगीत, चित्रकला आणि प्रदर्शन या स्वरूपात कलेचा अभ्यास केला जाऊ शकेल आणि ह्या कलेचे सादरीकरण देखील होऊ शकेल. मुक्ती कल्चरल हब लवकरच सामान्य लोकांसाठी खुले होणार आहे.

वर्ल्ड कल्चर डे आठवड्याच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम येथील मुक्ती कल्चरल हब ला जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद लाभला आहे.या कार्यक्रमास उपस्थित संजय लीला भंसाली, फराह खान, राकेश ओमप्रकाश मेहरा, श्रीराम राघवन, अली अब्बास जफर, सोनू निगम, शेखर सुमन, मधु मंटेना, नवाजुद्दीन सिद्दीकी, जावेद जाफ़री, मनीष मल्होत्रा, शेखर सुमन, नादिरा बब्बर, मकरंद देशपांडे, इला अरुण, डॉली ठाकोर, गुनीत मोंगा, सीज़र, गौहर खान, इंदर कुमार, अर्चना कोचर, नीरज काबी ,आनंद पंडित यांसारख्या इतर अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून स्मिता ठाकरे व त्यांच्या संपूर्ण टीमला पाठिंबा दर्शविला.

स्मिता ठाकरे म्हणतात की, “अंधेरीमध्ये कलात्मक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी बहु-उपयोग अशी ठिकाणे कमी आहेत. मुक्ती कल्चरल हब, जिथे परफॉर्मिंग आर्ट मधील कार्यरत लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील आणि ह्यामुळे हे ठिकाण उपनगरातील मनोरंजनाचे केंद्र बनण्याची आशा आहे. आज मला अत्यानंद होतो आहे की, अमिताभ बच्चन आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज या कार्यात मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आम्ही लवकरच मुक्ती कल्चरल हब सामान्य लोकांसाठी उघडू.”

मुक्ती कल्चरल हबमध्ये ३७८ लोकांना सामावून घेण्यार सक्षम असलेले ऑडिटोरियम आहे, ६८० चौ. फूट ची वर्कशॉप स्पेस, १००० चौरस फूट खुल्या टेरेसची जागा, २५०० वर्ग फूट चा डान्स स्टुडिओ सामावून घेणारे ऑडिटोरियम आहे. प्रत्येक जागी व्हीलचेयर प्रवेशयोग्यतेसह, द स्पेस ऑफ द आर्ट इक्विपमेंट प्रदान करून, फक्त सर्व मूलभूत गोष्टीच नव्हे तर पायाभूतदृष्ट्या देखील काळजी घेतली जाईल. मुक्ती सांस्कृतिक हब विविध प्रकारच्या कलात्मक आणि बौद्धिक गोष्टींसाठी छेदनबिंदूचे एक जंक्शन बनण्याची अपेक्षा करीत, विविध लोकसंख्येला त्याच्या दारेतून ओढत आहे.