लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी,प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल

0
20

३३० अधिकारी कर्मचारी तैनात,३९० पोलीसांचा चोख बंदोबस्त
आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल
भंडारा,दि. २० :-११-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होणार असून मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. मतमोजणीसाठी ३३० अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत. ३९० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा चोख
बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान पार पडले या निवडणूकीत १४ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद आहे.
भंडारा गोंदिया लोकसभेची मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होत असून मतमोजणीसाठी ९६ मतमोजणी पर्यवेक्षक, ९६ मतमोजणी सहाय्यक व १०२ सुक्ष्म निरिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील २१८४ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची मतमोजणी सोबत दिलेल्या फेèयानुसार
तुमसर विधानसभा-२६ फेèया, भंडारा विधानसभा ३३ फेèया, साकोली विधानसभा-२९ फेèया, अर्जूनी मोरगाव-२३ फेèया, तिरोडा-२२ फेèया व गोंदिया-२६ फेèया होणार आहेत. यासोबतच ईटीबीपीएस तथा टपाली मतपत्रिकांची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात २ टेबलवर होणार आहे.
तुमसर विधानसभा मतदार क्षेत्राची मतमोजणी लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुम नं. १५, भंडारा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. ११, साकोली विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं.१२,अर्जूनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. १४, तिरोडा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं. १०,गोंदिया विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रुम नं.१६ मध्ये होणार आहे. ११ एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील एकूण १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदान
केले मतदानाची टक्केवारी ६८.२७ एवढी आहे.
मतमोजणीसाठी मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार असून २२ मे २०१९ पासून हा परिसर सुरक्षा यंत्रणा ताब्यात घेणार आहे. यासाठी ३९० पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाèयांचे दोन प्रशिक्षण पार पडले असून २१ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
ज्यांना मतमोजणीचे प्रवेशपत्र देण्यात आले अशा अधिकारी कर्मचारी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतमोजणी परिसरात मोबाईल, पेनडड्ढाईव्ह, कॅमेरा तथा इलेक्टड्ढानिक्स डिव्हाईस सोबत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.लालबहादूर शास्त्री शाळा परिसरातील रस्तत्यावरील वाहतूक २२ व २३ मे २०१९ इतरत्र वळविण्यातआली आहे. मतमोजणीच्या दिवशी नागरिकांनी लाल बहादूर
शास्त्री शाळेच्या परिसरात गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतमोजणीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून मतमोजणीचे निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच आयोगाच्या सुविधा या एपवर नागरिकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतमोजणी परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी यांनी केले आहे.