कस्टम मिलींग संदर्भात मॉ शारदा स्टीम प्लॉंट वर बंदी जिल्हाधिकार्य्रांचा आदेश

0
32

देसाईगंज दि २०ः~एकाच ठिकाणी दोन वेग वेगळे राईस मिलचे फर्म दाखवुन बनावट दस्तावेजाच्या आधारे टीडीसीशी करारनामा करुन खोट्या कागदपत्रावर आदीवासी विकास महामंडळ कार्यालय गडचिरोली कडुन सिएमआर धान भरडाईचा काम मिळवणाय्रा मॉ शारदा स्टीम प्लॉंट ला भरडाई न देण्याबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज दि २० मे आदेश पारित केला आहे.
एकाच ठिकाणी दोन वेग वेगळे राईस मिलचे फर्म दाखवुन बनावट दस्तावेजाच्या आधारे आदीवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली ची करारनामा करुन फसवणुक केल्याने दोन्ही राईस मिल च्या प्रोप्रॉयटर्सवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत देसाईगंज येथिल यशवंत नाकतोडे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे दि १५ एप्रिल २०१९ ला केल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी आदीवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय गडचिरोली कडे केली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात आरमोरी -देसाईगंज रोडवरिल कोंढाळा जवळील मौजा वडेगाव रिठ साझा मधील वडसा वन परिक्षेत्राच्या भुमापण क्रमांक १०९/१ व १०९/२ या वन विभागाच्या राखिव जागेवर बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन उरवरीत भुमापण क्रमांक ११० या स्वमालकिच्या अकृषक जागेवर एकाच ठिकाणी जय अंबे राईस मिल व मॉ शारदा स्टीम प्लॉंट या दोन वेग वेगळे नावाची राईस मिल फर्म दाखवुन बनावट दस्तावेजाच्या आधारे आपल्याशी करारनामा करुन खोट्या कागदपत्रावर आदीवासी विकास महामंडळ कार्यालय गडचिरोली कडुन धान भरडाईचा काम मिळवुन प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी आदीवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय गडचिरोली ची फसवणुक केली होती.
प्रत्यक्षात या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मॉ शारदा स्टीम प्लॉंट केवळ कागदपत्रावरच अस्तित्वात असुन धान भरडाई साठी आपल्या कार्यालयाळी केलेल्या करारनामा व हा करारनामा करतांना जोडलेले संपुर्ण कागदपत्र पुर्णत: बनावट असुन घेतलेली बँक गॅरंटी देखिल खोटी आहे असे ही तक्रारीत म्हटले होते.
मॉ शारदा स्टीम प्लॉंट प्रत्येक्षात स्वतंत्र प्रकल्प नसुन धान भरडाई करित असल्याचा मोक्का चौकशी अहवाल न घेताच धान भरडाईचा काम देण्यापुर्वी आपल्या कार्यालयाने आर्थिक गैरव्यवहार करुन नियमबाह्य करारनामा करुन लाखो रुपयाच्या किंमतीचा धान भरडाईचा कंत्राट देण्यात आहे असाही आरोप केलेला होता.
मॉ शारदा स्टीम प्लॉंट ला स्वतंत्र व अखंड विद्युत पुरवठा सुरु असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले नाही, शिवाय स्टीम प्लॉंटला आदीवासी विकास महामंडळाच्या नियमावलीत धान भरडाई करिता करारनामा करुन देता येत असल्याबाबत तरतुदच नसतांना नियमबाह्य व बेकायदेशिररित्या करारनामा करण्यात आलेला आहे. जय अंबे राईस मिल व मॉ शारदा स्टीम प्लॉंट ही दोन मिल एकाच ठिकाणी दोन वेग वेगळे नावाची राईस मिल फर्म दाखवुन दोन वेग वेगळे प्रोप्रॉयटर्स आहेत.मॉ शारदा स्टीम प्लॉंट च्या नावाने प्रादेशिक कार्यालय आदीवासी विकास महामंडळ कडुन धान भरडाईचा कंत्राट घेऊन नित्कृष्ठ दर्जांचा तांदुळ आदीवासी विकास महामंडळाला पुरवठा करुन शासनाची फसवणुक केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला होता.यावर गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज ता २० ला मा शारदा स्टीम प्लॉंट ला सिएमआर धान भरडाईचा काम न देण्याबाबत आदेशीत केले आहे.