नागपूरात ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व काव्यमहोत्सव‘

0
29

नागपूर,दि.२१ः-‘सेवाव्रत बहुऊद्देशिय संस्था नागपूर‘,‘महर्षी मार्कंडेश्वर प्रतिष्ठान‘नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरात येत्या जुर्ले २०१९ मध्ये पहिला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.qसधुताई सपकाळ(माई) यांच्या प्रेरणने हा कार्यक्रम होत आहे.यावेळी ‘माईवेडी सिमा‘ या पुस्तकाचे प्रकाशन व आठवणीतील शाळा हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन कविवर्य ‘सुरेश भट सभागृह,रेशिमबाग,नागपूर‘ येथे होणार आहे
अनाथांची आई डाँ. सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘माईकट्टा महाराष्ट्र राज्य प्रतिष्ठान‘चे उदघाटन आणि माईंच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्या पुरस्कारामध्ये राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय आदर्श गुरू गौरवपुरस्कार,राज्यस्तरीय समाजभूषण कार्यगौरव पुरस्कार,राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार,राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार,राज्यस्तरीय वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार,राज्यस्तरीय कला-क्रीडा गुणगौरव पुरस्कार,राज्यस्तरीय उत्कृष्ठ कवी/ कवयित्री पुरस्कार व ‘अनाथांची आई‘ या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार‘ देण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील मान्यवरांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमादरम्यानच नामवंत कवी आणि कवयित्रींच्या काव्य महोत्सवाचा आस्वाद उपस्थित रसिकांना घेता येणार आहे.
प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि कवी संमेलनात कविता सादरीकरणासाठी इच्छुकांनी सिमा अ.राऊत पाटील नागपूर(८८३०६६८८२२),मारुती गुंडेवार नांदेड(९६२३१२४५९४) व शिक्षिका उषा नळगिरे नांदेड(७२१९५६८०५१)यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.