एसआरपीएफ तुकडी १३च्या गाडीला अपघात; १ जवान गंभीर तर १३ जवान जखमी

0
20

नांदेड,दि.22(नरेश तुप्टेवार)ः- नादेड येथे निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या मध्यभागी आज २२ मे रोजी बुधवारी सकाळी ७ .३० वाजेच्या सुमारास टॅब पासुन पूर्वेस १ की मी अंतरावर रोडचे काम चालु असल्याने एस.आर.पी.एफ.बल.गट नं. १३ गडचीरोलीचे वाहन (क्र.एम.एच. ३१ डी.झेड. ०२५२) पलटी खाल्यामुळे वाहनामधील १ जवान गंभीर तर १३ जवान किरकोळ जखमी झाले. त्याना औषधोपचार कामी बारड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात झाला. यामध्ये १ जवान गंभीर तर १३ जवान किरकोळ जखमी झाले आहेत. बल गट क्रमांक – १३ चे जवान नांदेड येथे वाहनाने निवडणुक बंदोबस्तासाठी जात होते.यावेळी रोडवरील शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या मध्यभागी येथे समोरील वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकानी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करण्याच्या प्रयत्नात वाहन पलटी झाले. या अपघातात एक जवान गंभीर तर तेरा जवान जखमी झाले आहेत.जखमी झोलल्या जवानांची नावे कळु शकले नाही अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी महामार्गाचे पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मदत केली. जखमी जवानांवर बारड येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.