मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

सुनील मेंढे 1 लाख 97 हजार विक्रमी मतांनी विजय

गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.23 : भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6,50,243 मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना 4,52,849 इतकी मते मिळाली.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या सुरवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनिल मेंढे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्यावर घेतलेली आघाडी कुठेच कमी झाली नाही.सातत्याने ती वाढत 1 लाख 97 हजार 384 मतांनी विक्रमी विजय मिळविला आहे.हा विजय नाना पटोले यांच्यापेक्षाही मोठा आहे.विशेष म्हणजे गेल्या पोटनिवडणुकीत व २०१४ च्या निवडणुकीत सुध्दा ज्या ठिकाणी भाजप मागे होती,त्या मतदारसघातही आघाडी घेतली.तिरोडा विधानसभा मतदारसंघात दोन्ही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार मागे होता.यावेळी मात्र प्रत्येक फेरीत याही मतदारसंघात आघाडी घेतली.तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात असलेली आघाडी वाढविल्याने काँग्रेसचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवालासांठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

मोदी लाटेमुळे २०१४ मध्ये देशात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत ही लाट कायम राहणार की चित्र बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.या लोकसभा मतदार संघात नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर २०१८ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात मोदी लाट नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील पुन्हा एकदा भाजपच्या बाजुने कौल दिल्याने पाच वर्षांनंतरही मोदी लाट कायम असल्याचे चित्र दिसून आले.नवमतदार हा पुर्णतःभाजपकडे वळल्याचे  व जातीय फॅक्टर या निवडणुकीत कुठेच चालले नसल्याचे दिसून आले.
पंचबुध्दे यांचा राजकीय प्रवास पाहता मेंढे हे नवखे उमेदवार होते. तर हे दोन्ही उमेदवार भंडारा जिल्ह्याचेच असल्याने या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार याकडे सुरूवातीपासूनच मतदारांचे लक्ष लागले होते. पंचबुध्दे यांच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघ पिंजून काढला. तर मेंढे यांच्या विजयासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.परिणय फुके यांनी मतदारसंघात तळ ठोकून बांधनी केली. तसेच स्वत:ला प्रचारात झोकून घेतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व आणि केलेली विकास कामे, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना तसेच भाजप सरकारने जनतेसाठी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. तसेच प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी त्या मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या आमदारावर सोपविली. यामुळे भाजपाच्या आमदारांनी सुध्दा निवडणुकी दरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. यासर्व गोष्टी मेंढे यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. विशेष म्हणजे सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथे जाहीरसभा घेतली. या सभेला सुध्दा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सुध्दा मतदारांचा कल बदलण्यास मोठी मदत झाली. यासर्व गोष्टीमुळे मेंढे यांच्या विजयाचे पारडे जड होण्यास मदत झाली. शिवाय या निकालाने भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुन्हा एकदा मोदी लहर कायम असल्याचे दिसून आले.

भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोंदियात घेतलेल्या सभेचा प्रभाव या निकालात दिसून आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्यात त्या सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला आपले मताधिक्य वाढविता आले आहे.जेव्हा की राष्ट्रवादीची धुरा एकट्या प्रफुल पटेलांनी हाती सांभाळली होती.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,छगन भुजबळ,धनजंय मुंडे,जंयत पाटील यांच्या सभांचा फारसा प्रभाव मतदारावर पडले नसल्याचे निकालातून
बघावयास मिळाले. यावेळच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा जो कॅडर बेस मतदारानेही बसपकडे पाठ फिरवली की काय असे चित्र आहे.गेल्या २०१४ च्या निवडणुकीत बसप ५0 हजाराच्याजवळपास होती यावेळी तिथपर्यंत बसप पोचली तर वंचित आघाडीनेह44 हजाराच्यावर मते घेऊन महाआघाडीला फटका दिला.
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते व कार्यकत्र्यांनी भरपूर कष्ट घेतले हे जरी खरे असले,तरी भाजपमधील दोन्ही जिल्हातील नेत्यांकडे बघितल्यास त्यांनी पाहिजे तसा प्रचार केलेला नव्हता.मात्र पोटनिवडणुकीतील पराभव हा कुठेतरी मनात होता.त्यातच पोटनिवडणुकीत हेमंत पटलेंच्यावेळी गप्प बसलेले आमदार परिणय फुके यांनी मात्र यावेळी सुनिल मेंढेकरीता स्वतःला झोकून दिले होते.पोवार समाजाला उमेदवारी नाकारली त्याचा फटका बसेल असा अंदाज होता मात्र अपक्ष राजेंद्र पटलेंना समाजानेही पाहिजे तसा साथ दिले नसल्याने ते 13 हजारामध्येच संपल्याने तुमसरातूनही त्यांना समर्थन नसल्याचे दिसून आले.पटले यांच्या नेहमीच्या स्वभावामुळेही समाजातील मतदारांनी मोदीवर विश्वास म्हणूनच भाजपला मतदान केले यात शंकाच राहिलेले नाही.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे विनोद अग्रवाल व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी नरेंद्र मोदींसाठी म्हणून निष्ठेने केलेल्या कामाचे फळ की या मतदारसंघात ३० हजाराच्यावर आघाडी भाजपला मिळविता आली,निवडणुकीच्या मतदानानंतर लगेच आपण २५ हजाराच्यावर आघाडी घेऊ हा विश्वास येथील भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.तो सार्थकी ठरला.
तर तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांच्यावर पोटनिवडणुकीत लागलेला ठपका त्यांनी पोटनिवडणुक व २०१४ च्या निवडणुकीतील राष्ट्रवादीची आघाडी मोडून काढत भाजपला मिळवून दिलेली 18 हजाराची आघाडी विधानसभेसाठी मात्र फलदायी राहणार आहे.
मोरगाव अर्जूनी मतदार संघ हा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा कार्यक्षेत्र.मागच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला १२२८७ मताची मिळालेली पिछाडी यावेळी मात्र त्यांनी भरुन काढली आहे.या मतदारसंघातवर नाना पटोलेंची छाप आहे ते या निवडणुकीत फिरकले नसल्याने मतदारांनी मोदींना मतदान करण्याचा निर्णय घेतला असावा असे म्हणायला हरकत नाही.

गोंदियातील राष्ट्रवादीचे कार्यालय व प्रफुल पटेल यांच्या कार्यालयात आज सकाळपासूनच शांतता होती.भाजपच्या बाजुने कल सुरु होताच 2014 मध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यक्रते कार्यालय सोडून गेले होते तशी परिस्थिती आज होती.
शिवसेना गोंदियाने जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.महायुतीच्या विजयात शिवसैनिकांनी केलेले काम महत्वाचे असून हिंदुराष्ट्रासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वस्व असल्याची प्रतिक्रिया ही दिली.
गोंदिया विधानसभा प्रभारी विनोद अग्रवाल यांनी विजयाबद्दल बोलतांना हा विजय देश,धर्म निष्टा,राष्ट्रप्रेम या सर्वासोबतच गेल्या पाच वर्षात सबका साथ सबका विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा सार्थकी ठरल्यामुळेच जनतेने आम्हाला हा विजय मिळवून दिला आहे.गोंदिया मतदारसंघात विरोधी पक्षाचे मातब्बर आमदार असतानाही आम्हाला मिळालेली 30 हजाराची लीड ही भविष्यातील निवडणुकीच्या विजयाची नांदी असल्याचेही म्हणाले.
माजी आमदार राजेंद्र जैन-या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे,मतदारांनी आमच्या पक्षाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा आम्ही नव्या ताकदिने येत्या विधानसभेच्या निवडणुकासाठी तयारी करु.
आमदार विजय रहागंडाले-गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून होत असलेली पक्षाची पिछेहाट कमी करण्यासाठी कार्यकर्ता,पदाधिकारी व सर्वांनी काम केले.त्यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावपातळीवरील सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या योजना सुरु केल्या त्या योजनांचा आम्हाला चांगलाचा लाभ मिळाला असून या विजयाचे सर्व श्रेय कार्यकर्ते,पदाधिकारी यांना जेवढे आहे तेवढेच प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 5 वर्षातील विकास कामांना असल्याचे म्हणाले.
परिणाम
क्रम संख्या अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत % मत
1 पंचबुधे नाना जयराम नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी 448285 4564 452849 36.38
2 डॉ. विजया राजेश नंदुरकर बहुजन समाज पार्टी 52433 226 52659 4.23
3 सुनिल बाबूराव मेंढे भारतीय जनता पार्टी 646152 4091 650243 52.23
4 के. एन. नान्हे वंचित बहुजन अघाडी 45587 255 45842 3.68
5 बी. डी. बोरकर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) 1462 6 1468 0.12
6 मरसकोल्हे भोजराज इसूलाल भारतीय शक्ति चेतना पार्टी 882 23 905 0.07
7 कलचुरी निलेश परणसिंग निर्दलीय 546 1 547 0.04
8 गजभिये प्रमोद हिरामन निर्दलीय 978 2 980 0.08
9 एड. जायस्वाल विरेन्‍द्रकुमार कस्तुरचंद निर्दलीय 2690 9 2699 0.22
10 देविदास संतुजी लांजेवार निर्दलीय 1542 7 1549 0.12
11 पटले राजेन्द्र सहसराम निर्दलीय 13079 66 13145 1.06
12 डॉ. सुनिल संपत चवळे निर्दलीय 1504 3 1507 0.12
13 सुमित विजय पांडे निर्दलीय 3028 3 3031 0.24
14 सुहास अनिल फुंडे निर्दलीय 6980 3 6983 0.56
15 NOTA इनमें से कोई नहीं 10412 112 10524 0.85
Total 1235560 9371 1244931
Share